27.3 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriड्रोन वापरासाठी शासकीय परवानगी सक्तीची

ड्रोन वापरासाठी शासकीय परवानगी सक्तीची

परवानगीशिवाय ड्रोनचा वापर केला गेला तर संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरामध्ये ड्रोन वापरण्याबाबत शासकीय परवाना फक्त चार जणांकडेच असल्याने इतर छायाचित्रकारा समोर पेच निर्माण झाला आहे.

कोरोना काळातील असणाऱ्या लॉकडाउनमुळे फोटोग्राफी व्यवसाय बंद ठेवण्यात आला होता. कोरोना निर्बंधांचे पालन करून फोटोग्राफी व्यवसाय सुरू करू द्यावा अशी अनेक दिवस फोटोग्राफर संघटनेतर्फे मागणी केली जात आहे. एकतर मागील दिड वर्ष हा व्यवसाय पुर्णत: बंद असल्याने, अनेक फोटोग्राफर आर्थिक विवंचनेत आहेत.

सध्या लग्न समारंभ इत्यादीसाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर सरहास केला जातो, पण आत्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने, प्री वेडिंग किंवा वेडिंग शूटिंगसाठी ड्रोनचा वापर करायचा असेल तर त्यासाठी भारत सरकारची परवानगी घेणे सक्तीचे केले असून, त्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागतो. स्थानिक पोलीस मुख्यालयामध्ये अर्जधारकांच्या कागदोपत्रांची पडताळणी केली जाते. त्यामुळे आत्ता परवानगी नंतरच ड्रोनचा वापर करणे शक्य आहे. अशा नवीन निर्बंधामुळे अनेक छायाचित्रकार अडचणीत आले आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या व्यवसायावर अजूनच परिणाम होताना दिसत आहे.

सध्या लग्न सोहळ्यात सर्व हौसमौज केली जाते, त्यामध्ये फोटोना विशेष महत्व आहे. वेडिंग व प्री वेडिंगसाठी शूटिंग किंवा फोटोग्राफी हाैसेने केली जात असल्याने फोटोग्राफी व शूटिंगसाठी खर्चही मोठया प्रमाणात केला जातो. परंतु, सरकारने आता ड्रोन वापरावर लावलेल्या निर्बंधांमुळे, ड्रोन सहज वापरणे शक्य होणार नाही. ड्रोन उडविण्यासाठी भारत सरकारची परवानगी घेणे आवश्यक असून, किती वजनाचा ड्रोन, किती उंचीवर उडविणार हे सर्व देखिल अर्जामध्ये नमूद करणे देखील सक्तीचे केले आहे. परवानगीशिवाय ड्रोनचा वापर केला गेला तर संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरामध्ये ड्रोन वापरण्याबाबत शासकीय परवाना फक्त चार जणांकडेच असल्याने इतर छायाचित्रकारा समोर पेच निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular