22.2 C
Ratnagiri
Wednesday, January 28, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeRatnagiriकृषी विभागाकडून “ई-मॉनिटरिंग” यंत्रणा लवकरच होणार कार्यान्वित

कृषी विभागाकडून “ई-मॉनिटरिंग” यंत्रणा लवकरच होणार कार्यान्वित

सरकारच्या ज्या काही सोई सुविधा शेतीसाठी असतात त्याबद्दल सुद्धा इत्यंभूत माहिती शेतकर्यांना मिळते.

सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार हे ऑनलाईन स्वरुपात होत आहेत. कमी वेळामध्ये काम मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पिक पाहणी यंत्रणेच्या आधारे आता शेतकरी स्वत: प्रशिक्षण घेऊन मोबाईलच्या माध्यमातून स्वत:च माहिती भरायला लागला आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या ज्या काही सोई सुविधा शेतीसाठी असतात त्याबद्दल सुद्धा इत्यंभूत माहिती शेतकर्यांना मिळते.

कृषी विभागाकडून लवकरच “ई-मॉनिटरिंग” यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ज्याद्वारे कृषी साहित्याचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी, कोणत्या कृषी साहित्य विक्री केंद्रातून किती शेतकर्‍यांना कोणते आणि किती बियाणे, कीटकनाशके विकण्यात आली यांची नोंद ठेवण्यासाठी ही प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. जेणेकरून होणारे व्यवहार हे कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकत ठरणार आहेत.

खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बियाणे, कीटकनाशके, खतांची मागणी वाढत असल्याने कृत्रिम टंचाईद्वारे त्याचा तुटवडा निर्माण करून काही विक्रेते हे साहित्य खूपच चढ्यादराने विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक भार सोसावा लागतो. त्यामुळे या सर्वावर लक्ष ठेवणारी यंत्रणा असली तरी ती प्रभावी ठरत नसल्याचेही समोर आले आहे.

त्यामुळे या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून महाआयटीच्या सहकार्याने ‘ई-मॉनिर्टंरग’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यात ‘ई-इन्व्हेंटरी’, ‘ई-इन्स्पेक्टर’आणि ‘ई-लॅब’ या तीन वेगवेगळ्या ‘अ‍ॅप्लिकेशन’चा समावेश करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी साहित्य विक्री केंद्रातील बियाणे, कीटकनाशकांच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. त्यांमुळे शेतकर्यांना मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा कायमस्वरूपी राहणार असून, त्यामध्ये फसवणुकीचे प्रमाण नसल्यागतच असेल. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular