25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriरत्नागिरीतील तरुणीवर अत्याचार; आणखी दोघे ताब्यात

रत्नागिरीतील तरुणीवर अत्याचार; आणखी दोघे ताब्यात

या जनप्रक्षोभामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.

नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. दोन दिवसांत नेमके हे प्रकरण काय ते उघड होईल, असा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे; मात्र पीडित मुलीने दिलेला जबाब आणि वस्तुस्थितीमध्ये काहीशी विसंगती आढळून येत असल्याने पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. लैंगिक अत्याचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने रत्नागिरीकर सुन्न झाले. संवेदना असलेले रत्नागिरीकर या हीन प्रकरणाच्या विरोधात संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले. या जनप्रक्षोभाला पोलिसांना तोंड द्यावे लागले.

‘संशयिताला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी द्या,’ अशी मागणी करत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात धडकले. या जनप्रक्षोभामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. संतप्त जमावाला आवरताना पोलिस दलाला नाकीनऊ आले. जमावाने अनेकदा ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न केला. तपास करण्यासाठी दोन-तीन दिवसतरी द्या, अशी विनंती जमावाला करण्याची वेळ पोलिसदलावर आली. पोलिसांनी त्यानुसार तपासाला गती दिली आहे. तरुणीने दिलेल्या जबाबानुसार, पोलिस प्रत्येक मुद्द्याची उकल करत आहेत. काही महत्त्वाची माहिती हाती लागली असून त्या अनुषंगाने काल तिघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आज या प्रकरणामध्ये आणखी प्रगती झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular