26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeChiplunनांदगावात दागिन्यांसाठी वृद्धेचा निघृण खून…

नांदगावात दागिन्यांसाठी वृद्धेचा निघृण खून…

आरोपीने त्यांच्या डोक्यात सिलिंडर मारला.

सिलिंडर डोक्यात घालून एका वृद्धेचा खून करण्यात आला. या वृद्धेच्या अंगावरील दागिने चोरून संशयित आरोपी पसार झाला. तालुक्यातील नांदगाव गोसावीवाडी येथे मंगळवारी (ता. २७) हा प्रकार घडला. या घटनेने सावर्डे परिसरात खळबळ उडाली आहे. संशयिताला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह चिपळूण आणि सावर्डेचे पोलिस जंगजंग पछाडत आहेत. तपासासाठी रत्नागिरीतून श्वानपथक बोलावले होते. त्यांनी दाखवलेल्या दिशेनुसार, पोलिसांचा तपास सुरू आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव गोसावीवाडी येथील परशुराम पवार (वय७०) मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता दहीहंडी पाहण्यासाठी घराबाहेर पडले.

सायंकाळी पावणेसात वाजता ते घरात आल्यानंतर पत्नी सुनीता पवार (वय ६८) घरात मृतावस्थेत आढळल्या. तिला या अवस्थेत पाहून पवार यांनी हंबरडा फोडला. त्यानंतर परिसरातील लोक त्यांच्या घरात दाखल झाले. सुनीता पवार यांचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला. सुनीता पवार यांच्या डोक्याची एक बाजू चेचली होती. त्यामुळे संशयित आरोपीने त्यांच्या डोक्यात सिलिंडर मारला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी घटनेची पाहणी केली. आज सकाळी सुनीता पवार यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. परशुराम पवार २००४ मध्ये मुंबई पोलिस दलातून निवृत्त झाल्यानंतर २०१३ ला ते गावी पत्नीसह राहत होते. त्यांचा मुलगा सतीश पवार मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. त्यांच्या मागे दर्शना साटम, रूपा सावंत, शिल्पा सावंत या तीन मुली आहेत.

कपाटातील दागिने, रोकड सुरक्षित – पवार यांच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत; मात्र घरातील कपाटात असलेले दहा हजार रुपये आणि सोन्याचे इतर दागिने सुरक्षित आहेत. परशुराम पवार घरात आले तेव्हा कपाटाचा दरवाजा आणि घरचे सर्व दरवाजे उघडे होते. संशयित आरोपीने सुनीता पवार यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने काढले आणि घरात कोणी येण्यापूर्वी तेथून पळ काढला. त्यामुळे कपाटातील दागिने आणि रोकड सुरक्षित राहिली, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular