26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriआरोग्य विभागातील भरती प्रक्रियेची बनावट वेबसाईट!

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेची बनावट वेबसाईट!

कोणत्याही शासकीय विभागाची भरती प्रक्रिया सुरु झाली कि, त्यामध्ये अडथळे बनतात ते खोट्या वेबसाईट बनवून सामन्यांची फसवणूक करणारे.

कोणत्याही शासकीय विभागाची भरती प्रक्रिया सुरु झाली कि, त्यामध्ये अडथळे बनतात ते खोट्या वेबसाईट बनवून सामन्यांची फसवणूक करणारे. अशीच एक घटना सध्या सुरु असलेल्या आरोग्य भरती बद्दल सुद्धा घडून आली आहे. आरोग्य विभागामार्फत राज्यामध्ये विविध वैद्यकीय तसेच इतर कर्मचारी पदांसाठी जाहिरात आली होती. त्यानुसार ती परीक्षा २५ व २६ सप्टेंबर रोजी नियोजित होती, परंतु, काही कारणास्तव ती परीक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे.

त्याचदरम्यान या पद भरतीची जेंव्हा जाहिरात आली तेंव्हा, रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या नावाने बनावट वेबसाईट तयार करुन त्याद्वारे आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. या माध्यमातून राज्यभरातील तरुण बेरोजगारांना गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावर उमेदवारांनी अर्ज न करण्याच आवाहन रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

२०१९ साला मध्ये ज्यानी अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल केले होते, त्यांची लेखी परीक्षा १६ व १७ ऑक्टोबरला रत्नागिरीमध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी १, आरोग्य सेवक- पुरुष- १७, आरोग्य सेवक फवारणी हंगामी पद ४६,  एएनएम १२६ , औषध निर्माता २५  जागा रिक्त आहेत.

त्यामुळे अशा बनावट साईटपासून सावधगिरी बाळगून कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार न करता आपली फसवणुक होण्यापासून वाचावे. आरोग्य विभागाच्या परीक्षांची पुढील तारीख जाहिर झाली असून शासनाच्याच साईटवर विश्वास ठेवून पुढील प्रक्रिया करावी.

RELATED ARTICLES

Most Popular