कोकण ही प्रत्येक पर्यटकांची पहिली पसंती असते, तशी कोकणातील रस्त्यांबद्दल मात्र पर्यटकांबद्दल नाराजी दिसून येते. एवढे सुंदर कोकण असून, रस्त्यांची एवढी दयनीय अवस्था का? अगदी देशा-विदेशा मधून देखील अनेक पर्यटक विशेष सहलींचे आयोजन करून येतात. पण रस्त्यांची अवस्था पाहून नकोसे वाटते. कोकणातील रस्ते यावर अनेक मेमेज सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसतात.
कोरोनामुळे जरी संचारबंदी असली तरी अत्यावश्यक सुविधांच्या वाहनांची ये-जा महामार्गावरून सुरु असते. राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम सध्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे. परंतु, कामाचा वेग आणि अनियमितता पाहता अजून दोन वर्ष तरी रस्त्यांची डागडुजी करण्यात नक्की पार पडतील असे अनेक जाणकारांचे मत झाले आहे. भरणे नाका येथे महामार्गाचे काम सुरु असल्याने, प्रत्यक्ष रस्त्याच्या असलेल्या सर्विस रोडची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, या सर्विस रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने, जर प्रशासनकडून त्यासंदर्भात त्वरित कारवाई झाली नाही तर स्थानिकांसह आम्ही येथे तीव्र आंदोलन छेडू,आणि पुढे जर काही विपरीत घडले तर त्याची जबाबदारी पुर्णत: शासनाची असेल, असा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार आंतरराष्ट्रीय समितीचे अमित कदम यांनी दिला आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्याची होणारी अत्यंत निकृष्ट दर्जाची दुरुस्ती त्यामुळे वाहतुकीला प्रचंड मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांना देखील जीवित आणि वित्तहानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भरणे नाकयातून अनेक विद्यार्थी जवळपासच्या शाळा, कॉलेजमध्ये ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला आहे. त्यांच्यासाठी स्काय वॉकची व्यवस्था करण्यात येण्याचे आवाहन केले आहे. अनेकदा निवेदन देऊनही काही ठोस उपाययोजना झाली नाही तर, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.