27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriजिल्ह्यातील हॉटेल आता रात्री १२ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची प्रशासनाची...

जिल्ह्यातील हॉटेल आता रात्री १२ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची प्रशासनाची परवानगी

शासनाच्या रात्री १०  वाजताच हॉटेल्स बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याने हॉटेल्स मध्ये कोणी ग्राहकच येत नसल्याने व्यवसायिकांना नुकसान सोसावे लागत होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्स व उपहारगृह व्यवसायाना कोविड निर्बंध नुसार सकाळी ८  ते रात्री १० पर्यंतच परवानगी देण्यात आली होती! या निर्बंधामुळे हॉटेल व्यवसाय पुरता ढासळला होता ! रात्री ९ नंतर हॉटेल्स मध्ये ग्राहक यायला सुरुवात होत असते आणि शासनाच्या रात्री १०  वाजताच हॉटेल्स बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याने हॉटेल्स मध्ये कोणी ग्राहकच येत नसल्याने व्यवसायिकांना नुकसान सोसावे लागत होते.

या सर्व विषयावर दाद मागण्यासाठी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असो.चे पदाधिकारी अध्यक्ष श्री रमेश कीर यांचे मार्गदर्शना नुसार उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई सुहास ठाकुरदेसाई, गणेश धुरी, कौस्तुभ सावंत, राकेश भोसले, महेश सावंत यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांची भेट घेऊन हॉटेल व्यवसायिकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.

आणि हॉटेल बंद करण्याची वेळ रात्री ११  नंतर करावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. रमेश कीर यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नाम. उदय सामंत यांची भेट घेऊन हॉटेल व्यवसायिकांना न्याय देण्याची विनंती केली होती. हॉटेल व्यवसायिकांची हि अडचण ओळखून आज जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश काढले असून याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृह दररोज रात्री १२ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन व रत्नागिरी जिल्हा हॉटेल असो.चे अध्यक्ष रमेश कीर व सर्व पदाधिकारी याना धन्यवाद दिले आहेत !

RELATED ARTICLES

Most Popular