27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

लांज्यात रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास पोलिस बंदोबस्तात प्रारंभ

मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरात रस्त्याच्या कडेला...

रत्नदुर्ग किल्ल्यावरून थेट समुद्रात, तरूणीच्या मृत्यूचे गूढ

रत्नदुर्ग किल्ल्यावरून समुद्रात कोसळलेल्या तरूणीचे गूढ हळूहळू...

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...
HomeRatnagiriस्वातंत्र्य दिनाची रूपरेषा जाहीर

स्वातंत्र्य दिनाची रूपरेषा जाहीर

रत्नागिरी जिल्हाधिकारी सभागृह येथे आयोजित स्वातंत्र्यदिन पुर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी बोलताना, रत्नागिरीतील कोरोनाची स्थिती पाहता, बाधितांची संख्या कमी आली असली तरी,  संसर्ग टाळण्यासाठी १५ ऑगस्टचे ध्वजारोहण ऑनलाईन फेस बुक लाईव्ह व यु टिव्ही लाईव्ह च्या माध्यमांतून स्वांतत्र्यदिनांचा समांरभ जनतेपर्यंत पोहचवा असा निर्देश रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी दिले आहेत. सदर आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, डीवायएसपी एस.एल पाटील, जिल्हा परिषदेच्या उप मुख्यकार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरडवेकर, शाखा अभियंता ज.ह.धोत्रेकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

१५ ऑगस्टला रत्नागिरी येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पोलीस परेड ग्राऊंड येथे सकाळी ०९.०५ वाजता पालकमंत्री, रत्नागिरी यांच्या हस्ते संपन्न होणार असून, सदर दिवशी सकाळी ०८.३०  ते ०९.३५ च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

15 August 2021

त्याचप्रमाणे येत्या १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून करणार असलेल्या भाषणात आपले विचार समाविष्ट करण्यासाठी, सर्वांनी MyGov पोर्टलवर आपले विचार पाठवावेत, असं आवाहन पंतप्रधान कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. लाल किल्ल्याच्या बुरुजावरून आपले विचारच प्रतिबिंबित होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काय मुद्दे असावेत असं आपल्याला वाटतं? ते @mygov india वर नक्की शेअर करा. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने MyGov च्या या आवाहनाला टॅग करून ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular