26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यातील सराफी पेढ्याचा लाक्षणीय संप

रत्नागिरी जिल्ह्यातील सराफी पेढ्याचा लाक्षणीय संप

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता, मागील दीड वर्षापासून सराफांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी आल्यावर शासनाने कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आल्याने, मागील आठवड्यापासून सर्व दुकाने सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली. मोठ्या कालखंडानंतर सराफांची दुकाने खुली करण्यात आली परंतु, दागिन्यांच्या शुद्धतेची पारख करण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने हॉलमार्किंग युनिक आयडी कायदा अमलात आणला.

दागिन्यांवर मारण्यासाठी शुद्धतेचा स्टॅम्प हॉलमार्किंग कायद्याचे देशातील ज्वेलर्सने स्वागत देखील केले आहे. आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरु होती;  परंतु आत्ता बीआयएसने शुद्धतेच्या ४ प्रमाणित शिक्क्यामंध्ये बदल करीत हॉलमार्किंग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची पध्दत राबविण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे, तर ही पध्दत लागू करताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थांबरोबर चर्चा न करता हे बदल घडवून आणण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांनाही नाहक जास्त प्रमाणात कागदी घोडे नाचवावे लागत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन राज्याचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी लाक्षणिक संप केला जाणार असल्याचे जाहीर केले. त्यांना रत्नागिरी सराफ संघटनेनेही पाठिंबा दर्शविला आहे. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार असून सर्व सराफी दुकाने आज २३ ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने हॉलमार्किंग युनिक आयडी शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ राज्यभरातील सुवर्णकार आज एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याचे राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने जाहीर केले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सराफी पेढ्या बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष खेडेकर यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular