26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriकर्ज मंजूर करण्याच्या रकमेतून फसवणूक, आरोपी ताब्यात

कर्ज मंजूर करण्याच्या रकमेतून फसवणूक, आरोपी ताब्यात

श्री. प्रसादे यांनी दि. २२ मार्च ते सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत तब्बल ९ लाख २६ हजार रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी संबधीत व्यक्तींच्या बँक खात्यावर जमा केले.

रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथील साई आनंद प्रसादे यांना राजेश नडीमेटला रा. सोलापूर या व्यक्तीने पुण्यातील ॲक्सिस बँकेतून ८ लाख रु.चे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून श्री. प्रसादे यांनी दि. २२ मार्च ते सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत तब्बल ९ लाख २६ हजार रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी संबधीत व्यक्तींच्या बँक खात्यावर जमा केले. मात्र, त्यानंतरही कर्ज मंजूर न झाल्याने श्री. प्रसादे यांनी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

आठ लाखांच्या कर्जाच्या नोंदणी शुल्कासाठी तब्बल ९ लाख २६ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या राजेश भूपेश नडीमेटला वय २५ रा. राघवेंद्र मंदिरा जवळ, विडीघरकुल, हैद्राबाद रोड, सोलापूर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

मात्र ८ लाखांच्या कर्जासाठी प्रसादे यांनी तब्बल ९ लाख २६ हजार रु. कसे दिले ? कर्जाच्या रक्कमे पेक्षा कर्ज मंजूर करण्यासाठी जास्त पैसे कसे काय देण्यात आले! असा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यानंतर शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

राजेश भूपेश नडीमेटला हा सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या नेतृत्वाखालील पथकामधून प्रशांत बोरकर,अरुण चाळके,विजय आंबेकर, सागर साळवी सोलापूर येथून नडीमेटला अटक करून शहर पोलीस यांच्या ताब्यात दिले आहे. अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular