27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

चिपळूण शहरामध्ये मगरीचा वावर, पेट्रोलपंपात आढळली

वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना शहरातील सखल भाग...

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...
HomeKokanकोकण विभागासह सर्वत्र, शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

कोकण विभागासह सर्वत्र, शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

कोकण शिक्षक मतदारसंघातून ३१ हजार ५३६ शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

कोकण विभागासह राज्यातील इतर शिक्षक मतदारसंघातील शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू असून कोकण शिक्षक मतदारसंघातून ३१ हजार ५३६ शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

निवडणूक आयोगाच्या नियोजित कार्यक्रमानुसार ७ नोव्हेंबरपर्यंत शिक्षक मतदार नोंदणीचे अर्ज भरून द्यायचे होते. शिक्षक भारतीच्या कोकण विभागातील सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या शिक्षक मतदार नोंदणीचा विहित पूर्व नियोजित कार्यक्रम लक्षात घ्यावा. त्यानुसार २३ नोव्हेंबरच्या प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप यादीचे सुक्ष्म अवलोकन करून जे पात्र शिक्षक मतदार नोंदणीपासून अद्यापही वंचित राहिलेले आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांचे शिक्षक मतदार नोंदणीचे फॉर्म पूर्णपणे भरून संबंधित तहसील कार्यालयात जमा होण्याबाबत लक्ष घालावे. संबंधितांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असे आवाहन शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी केले आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघ नोंदणीसाठी ठाणे ११ हजार ७१३, पालघर ५ हजार ४३६, रायगड ८ हजार ८७९, रत्नागिरी ३ हजार ७२९ आणि सिंधुदुर्ग १ हजार ७७९ असे एकूण ३१ हजार ५३६ शिक्षकांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज दिले आहेत. या अर्जाची छाननी करून प्रारूप शिक्षक मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाच्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ९ डिसेंबरपर्यंत नोंदणी न झालेल्या उर्वरित पात्र शिक्षकांसाठी दावे व हरकती देण्यासाठीचा हक्क राहील. त्यानंतर ३० डिसेंबरला शिक्षक मतदार नोंदणी झालेल्या शिक्षकांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular