24.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriमालकिणीच्या घरात ५१ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला, गुन्हा दाखल

मालकिणीच्या घरात ५१ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला, गुन्हा दाखल

तालुक्यातील गोळप सडा येथे घरकाम करणार्‍या महिलेने मालकिणीच्या घरात ५१ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद पूर्णगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

रत्नागिरीमध्ये चोऱ्यांच्या प्रकरणांनी बऱ्याच कालावधीनंतर डोके वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोना कालावधीमध्ये चोऱ्या करण्याच प्रमाण कमी झाले होते. तालुक्यातील गोळप सडा येथे घरकाम करणार्‍या महिलेने मालकिणीच्या घरात ५१ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद पूर्णगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. अनेक नोकरदार महिला घरकामासाठी असलेल्या महिलांवर डोळे झाकून विश्वास ठेवून घर सोपवून जातात. पण त्यातील काही कामगार अशा प्रकारची कृत्य करतात, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांवर पण संशय निर्माण होतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री अशोक सोहनी वय ५५,  जोशी कंपाउंड, गोळप सडा यांच्या घरामध्ये दोन महिला घर कामासाठी ठेवलेल्या आहेत. वनिता रमाकांत घाणेकर वय ५९,  वैशाली संदीप घाणेकर वय ४२, रा. संजीवनीनगर, गोळप अशी घरकाम करणार्‍या महिलांची नावे आहेत.

जयश्री सोहनी यांनी घरातील गोदरेजच्या कपाटात प्लास्टीकच्या डबीत मंगळसूत्र, अंगठी आणि कानातील रिंग काढून ठेवले होते. आणि त्या कपाटाची चावी त्यांनी आपल्या बटव्यात ठेवली होती. त्यांच्या बटव्यातील चावी घेवून कपाटात ठेवलेले ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र,  १२ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, ९ हजार रुपये किंमतीचे कानातील रिंग असा एकूण ५१ हजार रूपयांचा माल चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात दिली.

या तक्रारीत त्यांनी वरील वर्णनाचा माल हा घरकाम करणार्‍या वनिता घाणेकर या महिलेने चोरल्याचा  दाट संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी वनिता रमाकांत घाणेकर वय ५९, रा. गणेशनगर, गोळप रत्नागिरी हिच्यावर भादविकलम ३८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular