26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriमालगुंड कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

मालगुंड कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित

रत्नागिरीमधील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सध्या मोठ्या प्रमाणात सापडायला लागले असल्याने, जिथे जास्त बाधित रुग्ण आढळतील, त्या गावाला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून, गावातील सर्वांची सरसकट कोरोना चाचणी करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिले आहेत.

रत्नागिरी गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्याला मालगुंड नावाच्या गावात सुद्धा कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडू लागल्याने कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. जो पर्यंत रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही, तोपर्यंत अमर्यादित दिवसासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. मालगुंड गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येच प्रमाण वाढल आहे. तसेच काही दिवसांपूर्वी दोन वाड्यांमधील अनेकांना क्वॉरंटाईन सुद्धा करण्यात आले होते. सध्या मालगुंड मध्ये १२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाने मालगुंड हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला असून, अमर्यादित लॉकडाऊन देखील करण्यात आला असून, मालगुंडमध्ये प्रत्येक वाडीमध्ये जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे,  बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तिंना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मालगुंड महावितरण कार्यालय जीवन शिक्षण शाळेपासून ते भंडारवाड्याकडे जाणारा रोड, समाधान हॉटेल येथील दोन्ही रस्ते बळीराम परकर विद्यालयाजवळील भंडारवाड्याकडे व मराठवाडीकडे जाणारे रस्ते कुंभारवाडा येथील तळेपाटवाडी आदी सर्व वाड्यातील रस्ते पूर्ण बंद करण्यात आले आहेत. पंचक्रोशीची असलेली बाजारपेठ सुद्धा फक्त अत्यावश्यक आरोग्य सेवा सोडल्यास सर्वच बंद ठेवण्यात आली आहे.

जयगड सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे,  गणपतीपुळे दूरक्षेत्राच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांच्या मार्गदर्शना खाली गावाच्या सीमेवर चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून, सर्व गाव निगराणीखाली आहे. जर कोणी विनाकारण दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular