26.9 C
Ratnagiri
Sunday, July 20, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriरत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय दोषी नाही…

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालय दोषी नाही…

नोटीस बजावण्यात आलेल्या खासगी महाविद्यालयांचाही समावेश आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवून पदवी शाखेतील शिकाऊ (इंटर्स), निवासी डॉक्टर यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाची माहिती मागितली होती. राज्यातील २० वैद्यकीय महाविद्यालयांनी आयोगाला ही माहिती न दिल्याने दंडात्मक कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामध्ये रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे; परंतु या वैद्यकीय महाविद्यालयाची अजूनही शेवटची बॅच पास झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांबाबत माहिती उपलब्ध नाही. यात महाविद्यालयाचा दोष नाही, असे आयोगाला कळवल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. वर्षाच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने आयोगाकडून देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी शाखेतील इंटर्न्स, निवासी डॉक्टर यांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाची माहिती मागितली होती.

त्यानुसार देशभरातील १९८ वैद्यकीय महाविद्यालयांनी माहिती दिलेली नाही. त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये धुळे येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार या महाविद्यालयांचा समावेश आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या खासगी महाविद्यालयांचाही समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular