29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान वाटतोः ना. सामंत

शैक्षणिक क्षेत्रात विविधं प्रयोग होत आहेत. त्यामुळे...

खेडच्या जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर खेड जवळ पुलाजवळ...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

पोलिसांकडून डमी ग्राहकाने फोन केला... मोठं गिऱ्हाईक...
HomeRatnagiriमिऱ्या समुद्रकिनारी महाकाय मृत ब्लू व्हेल

मिऱ्या समुद्रकिनारी महाकाय मृत ब्लू व्हेल

रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या येथील समुद्रकिनारी महाकाय मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. शनिवारी सकाळी येथील ग्रामस्थांना हा मासा आढळून आला. ग्रामस्थांच्या मते हा मासा ब्लू व्हेल प्रजातीचा असण्याची शक्यता आहे. या माशाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असून समुद्रच्या प्रवाहासोबत हा मासा वाहत मिऱ्या किनाऱ्यावर आला असल्याची शक्यता आहे. हा भलामोठा मासा पाहण्यासाठी स्थनिकानी गर्दी केली होती

रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या जाकिमिर्‍या पाटील वाडी  भागात समुद्र किनारी  आज सकाळी अवाढव्य असा व्हेल मासा मृतावस्थेत सापडला हा मासा अंदाजे पस्तीस ते चाळीस फूट लांबीचा असून तो मृत अवस्थेत मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर वाहत आला आहे.

जाणकरांच्या मते, साधारणपणे खोल समुद्रात १५ दिवस आधी त्याचा मृत्यू ओढवला असून, त्यानंतर तो लाटांबरोबर वाहन येऊन रत्नागिरीच्या समुद्र किनारी लागला आहे. या ४० फुटी माश्याचे शरीर काही प्रमाणात कुजले असून, त्याची सर्व दुर्गंधी आसपासच्या परिसरामध्ये पसरली आहे. स्थानिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिकांनी वन आणि मत्स्य विभागाच्या अधिकार्यांना खबर दिली असता, ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समुद्राकीनारीच मोठा खड्डा खोडून त्यामध्ये या ब्लू व्हेलला पुरणार असल्याचे सांगितले. माशाचे शरीर कुजत चालले असल्याने लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

वातावरणात होणार्या वारंवार बदलामुळे, भूकम, वादळे यांच्यामुळे खोल समुद्रात असणाऱ्या माशांची दिशाभूल होऊन ते असे समुद्र किनार्याजवळ येतात. सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी माशांसाठी टाकलेल्या जाळ्यामध्ये २-३ डॉल्फिन मासे मिळाले होते. मासेमार्यानी अलगद त्यांची सुटका करून परत त्यांना समुद्रात सोडून जीवदान दिले.

RELATED ARTICLES

Most Popular