रत्नागिरी शहर परिसरातील प्रसिद्ध हायस्कूलमधील अल्पवयीन मुलींना घेऊन एक अल्पवयीन मुलगा आणि दुसरा २१ वर्षाचा मुलगा अशी चौघ जण बेपत्ता झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील एका हायस्कूलमधील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या मुली आपल्या मित्रांबरोबर पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात ती मुले नागालॅंड राज्याची राजधानी कोहिमा या शहरात असल्याचे समोर आल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
सोमवारी जेव्हा ती पळून गेली, तेव्हा ती जिल्ह्यातील एका धबधब्यावर फिरायला गेली होती. तेथून रत्नागिरीत ते परत आले; मात्र त्यापैकी एका मुलाने घरून भरपूर रक्कम आणली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा घरी परतण्याचा निर्णय बदळून ते रेल्वेने मुंबईला रवाना झाले. तेथून त्यांनी दिल्ली गाठली. घरी न पोहोचल्याने पोलीस आपले मोबाईल ट्रेस करणार म्हणून सर्वांनी हुशारीने मोबाईल स्वीच ऑफ केले होते; केवळ काही गरजेच्या ठिकाणीच ते सुद्धा रेल्वे स्टेशनवरील वायफायचा वापर करून ते व्हॉट्सअॅप कॉल करत होते. त्यांच्या समजुतीनुसार, हा कॉल ट्रेस होणार नाही, परंतु, तेथेच त्यांचा अंदाज फसला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्यांचे काही कॉल ट्रेस करण्यात आले, आणि पोलिस त्यांच्या सतत मागावर राहिले होते.
जिल्ह्यातील एका धबधब्यावर आनंद लुटल्यानंतर ते मुंबई, दिल्ली करून कोहिमा शहरात गेले. त्यापैकी एक जण भलताच तांत्रिक दृष्ट्या हुशार होता. त्याने मोबाईल स्वीच ऑफ करून रेल्वे स्थानकाच्या वायफायवर गरजेच्या ठिकाणी व्हॉट्सअॅप कॉल केले; मात्र तेच त्यांना अडचणीचे ठरले आणि पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञाचाना वापर करून त्यांच कॉलवरून त्यांचा शोध घेतला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या मुलांना लवकरच पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. ही अल्पवयीन मुले एवढ्या लांब नागालॅंडला पोहचली कशी, याबाबत मात्र सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती.
मुलांचा ट्रेस लागल्यावर पोलिसांनी तत्काळ कोहिमा पोलिसांशी संपर्क साधून, त्यांना ताब्यात घेण्यास सांगितले. त्यांच्याकडून रत्नागिरी शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, जेव्हा ही मुले नागालॅंडला पोहचली, तेव्हा त्यांच्याकडील असलेले पैसे संपल्याने त्यांच्यापुढे पोलीस स्टेशनला हजार होण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही. पोलिसांनी तेथील बालसुधारगृहात त्यांना ठेवून रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांच्या ताब्यात दिले.