29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जिल्हा प्रशासनाला शिक्षकांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा, २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा सुरू ठेवा, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा जोरदार घोषणा देत प्रथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो शिक्षक सहभागी झाले. शिक्षकांच्या आक्रोश मोर्चाची सुरवात शासकीय विश्रामगृह येथून झाली. या मोर्चामध्ये महिला, पुरुष शिक्षक सहभागी झाले होते. महिलांची संख्या मोठी होती. हातात घोषणांचे फलक घेऊन गुरूजी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या वेळी जिल्हा प्रशासनाला शिक्षकांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

शिक्षक व सर्व कर्मचारी यांना तत्काळ जुनी पेन्शन योजना लागू करा, दत्तक शाळा योजना तत्काळ रद्द करा, कंत्राटीकरणाचा शासन आदेश रद्द करा, कमी पटाच्या शाळा एकत्रीकरण करण्याचा शासन आदेश रद्द करा, शिक्षकांकडील सर्व अशैक्षणिक कामे तत्काळ रद्द करा, ऑनलाइन माहितीचा भडीमार थांबवा, शिक्षकांना पूर्ण वेळ शाळेत थांबून शिकवायला द्या, शिक्षण विभागाला आवश्यक ते अनुदान तत्काळ द्या, शिक्षकांची मुख्यालयाची अट रद्द करा, एमएससीआयटीची अट रद्द करा, दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सहाय्यक उपकरणांसाठी आवश्यक अनुदान मंजूर करा, करा, सर्व प्रकारची पदोन्नती तत्काळ पूर्ण शिक्षकांकडील पोषण आहाराची जबाबदारी अन्य यंत्रणेकडे द्या, बीएलओचे काम कायमचे शिक्षकांकडून काढून घ्या, या मागण्यांचा यामध्ये समावेश होता.

तर सरकारला घरी पाठवणार – या मागण्यांची तत्काळ दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अन्यथा यापुढे शिक्षक आक्रमक आंदोलन करतील. गुरुजी जर पेटून उठला तर सरकारलाही घरी पाठवायला कमी करणार नाही, असा इशारा राज्य संपर्कप्रमुख विकास नलावडे यांनी दिला. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस संदीप जालगांवकर, कार्याध्यक्ष कैलास शार्दुल, कोषाध्यक्ष चंद्रकांत कोकरे, संतोष रावणंग आदी शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular