27.8 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

एलआयसी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

रत्नागिरीतील एलआयसी कार्यालयाबाहेर एलआयसी विमा प्रतिनिधी आणि...

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...
HomeRatnagiriमहावितरणच्या गो ग्रीन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

महावितरणच्या गो ग्रीन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

या सेवेसाठी नोंदणीकृत ग्राहकांना दरमहा छापिल कागदी वीज बिला ऐवजी ई- मेलवर वीज बिल पाठविले जाते

सध्या विजेची टंचाई, कोळशाचा अपुरा पुरवठा, भारनियमन यामध्ये राज्य अडकून आहे. तर कोरोना काळापासून बहुतशे सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले असल्याने, जास्तीत जास्त पेपरलेस वर्क करण्याकडे अनेकांचा काळ झालेला आहे. त्यामध्ये महावितरणाची गो-ग्रीन सेवेचा देखील समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरणने वीज ग्राहकांना गो ग्रीन सेवेद्वारे ई- मेलवर वीज बिल पाठविण्याची सुविधा उपलब्ध केली असून, रत्नागिरीतील ४ हजार १० तर सिंधुदुर्गच्या २ हजार ६०३ वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी केली आहे. या सेवेसाठी नोंदणीकृत ग्राहकांना दरमहा छापिल कागदी वीज बिला ऐवजी ई- मेलवर वीज बिल पाठविले जाते. शिवाय वीज बिलात १० रुपयांची सवलतही देण्यात येणार आहे.

वीज ग्राहकांनी पर्यावरण हितार्थ कागद वाचवून झाडे वाचविण्यासाठी गो ग्रीन सेवेची निवड करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. वीज ग्राहकांनी गो ग्रीन सेवा निवडीसाठी https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp  या लिंकचा वापर करावा. या लिंकवर आपल्या वीज ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट आधारे ई-मेल पत्ता व छापिल वीज बिलावर डाव्या कोपर्‍यात चौकटीत दिलेला १५ अंकी बिल नं/गो ग्रीन क्रमांक (GGN) नोंदवून सेवेची निवड करावी. त्यानंतर गो ग्रीन सेवा नोंदणी पूर्ण करण्यासाठी आपल्या ई- मेल पत्त्यावर आलेल्या लिंकवर क्लिक करा.

आपले वीज बिल स्पॅम फोल्डर मध्ये जाऊ नये यासाठी महावितरणचा msedclšebillmahadiscom.in हा ई- मेल पत्ता आपल्या ई- मेल वरील पत्त्यामध्ये नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीज बिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीज बिल मिळणार असून, संदर्भासाठी वीज बिलाचे जतन करणेही सोपे होणार आहे. हा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीजग्राहकांनी कागद विरहित गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular