रत्नागिरी नगरपरिषदेच्या मार्फत घरपट्टी, वीजबिल, पाणी बिलाची जि थकबाकी आहे ती वसुली करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु आहे. त्यातील कोटींची थकीत घरपट्टी भरण्यासाठी पालिकेची गाडी सगळीकडे फिरत असून जनतेला, व्यावसायिकांना थकीत बिले भरण्यासाठी मुदत देखील देण्यात आली होती. परंतु अद्यापही नागरिक या गोष्टीकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. आर्थिक वर्ष संपत आले तरी सुद्धा अजून लाखोंची घरपट्टी वसुली करण्याचे ध्येय नगरपालिका कर्मचार्यांसमोर उभे ठाकले आहे.
त्यामुळे आत्ता नगरपालिकेने वसुलीचे धोरण सक्तीचे केले असून, अजूनही जे थकबाकी भरण्यास दिरंगाई करताना दिसत आहेत त्यांचे गाळे, दुकान, यांना सरळ सील करण्यात आले आहे. पालिकेच्या या धडक कारवाईने अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. आर्थिक वर्ष संपत आल्याने रत्नागिरी नगरपरिषदेच्या वसुली पथकाने थकबाकी धारकांना दणका द्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये अनेक शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, दुकाने, गाळे, इमले इत्यादींचा समावेश आहे.
रत्नागिरी पालिकेचा कर चुकविणाऱ्या आणि थकविणाऱ्या ४७ मालमत्ता नगर परिषदेने ‘सील’ केल्या. त्यात मोबाईल टॉवर, मंगल कार्यालय, इमले आणि नॉन बॅंकिंग कंपन्यांच्या काही खाजगी कार्यालयांचा समावेश आहे. पालिकेपुढे अजूनही साडेसहा कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सरळ नाही तर कडक धोरण आखून हि थकबाकी गोळा करणे जरुरीचे आहे. त्यामुळे एवढ्या मालमात्त सील केल्यावर सुद्धा उर्वरित थकबाकी धारकांना नगर परिषदेची कडक कारवाई टाळण्यासाठी इमलेधारकांनी कर भरून कारवाई होण्यापासून टाळावी, असे आवाहन पालिकेने केले जात आहे.