26.9 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriनगरपालिकेचा कर थकवण्यात शासकीय कार्यालये आघाडीवर

नगरपालिकेचा कर थकवण्यात शासकीय कार्यालये आघाडीवर

१८० शासकीय कार्यालयांची ६० लाख ६६ हजार एवढे रुपये थकवले आहेत.

रत्नागिरी नगर पालिकेमार्फत थकबाकी वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पालिकेची थकीत घरपट्टी किंवा इतर कर थकवणाऱ्या मध्ये शासकीय कार्यालये आघाडीवर आहेत. रत्नागिरी पालिकेचा कर अनेक शासकीय कार्यालयांनी भरलाच नसून, या गोष्टीकडे मुद्दामहून कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे.

परंतु, पालिकेने सुद्धा या बाबतीत कडक शासन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर थकवणाऱ्या शहरातील शासकीय कार्यालयांविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १८० कार्यालयांची एकूण ६० लाख ६६ हजारांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वांत जास्त शासकीय रुग्णालय,  बीएसएनएल कार्यालय,  डाकघर कार्यालय, जिल्हा परिषद आदींचा समावेश आहे.

तसेच या आधीही पालिकेने थकबाकीचा निपटारा करण्यासाठी विविध सवलती दिल्या होत्या. तरीही अनेक शासकीय कार्यालये थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत आहे. तरीही आता थकबाकी भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र संबंधित कार्यालयाला सील ठोकण्यात येणार असून,  सर्वात प्रथम १६ लाखांचा कर थकविणाऱ्या जिल्हा रुग्णालयाला सील ठोकण्याचा पालिका प्रशासनाचा विचार आहे.

रत्नागिरी पालिका घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने आधीच संकटात आहे. त्यात कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांची घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट्य १४ कोटींवर गेले आहे. या थकबाकीमध्ये शासकीय कार्यालयांचीही मोठी थकबाकी दिसत आहे. १८० शासकीय कार्यालयांची ६० लाख ६६ हजार एवढे रुपये थकवले आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने त्यांना अनेक वेळा नोटीस पाठवलेली आहे. परंतु अद्याप सुद्धा या थाक्वकीचा भरणा करण्यात आलेला नाही त्यामुळे अखेर कडक कारवाईचे धोरण अवलंबण्याचा निर्णय पालिकेद्वारे घेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular