29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeRatnagiriरत्नागिरी पालिकेची कारवाई, अनधिकृत बांधकामाबद्दल ११ जणांना नोटिसा

रत्नागिरी पालिकेची कारवाई, अनधिकृत बांधकामाबद्दल ११ जणांना नोटिसा

नोटिशींना १५ दिवस होऊन गेले तरी कोणत्याही दुकानदाराने आपले बांधकाम स्वतःहून काढलेले नाही

शहरातील चर्मालय ते कोकणनगर पर्यंतच्या रस्त्यामध्ये येणारी अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या नोटिसा पालिकेच्या मालमत्ता विभागाने बजावल्या आहेत. हा रस्ता शंभर फुटी करण्यात येणार असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ११ जणांचा समावेश आहे. त्यासाठी २० दिवसांची मुदत देऊनही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी नोटिसीला दाद दिलेली नाही. कोकणनगर येथील रस्त्याच्या बाजूला अनेक अनधिकृत शेड आणि बांधकामे आहेत. यामध्ये व्यवसाय केले जात असून, या अनधिकृत दुकानांबाबत येथील रहिवाशांकडून पालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. तक्रारीनंतर ऑगस्ट महिन्यात पालिकने या सर्व अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा काढल्या.

रत्नागिरी शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेमधील रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. पालिकेच्या मालकीची ही जागा असल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे. पालिकेच्या या जागेत अनेक शेड, खोके उभारून तेथे दुकाने चालवली जात आहेत. महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ अन्वये ही नोटीस मिळाल्यापासून तत्काळ ही अतिक्रमणे काढून घ्यावीत; अन्यथा ती पालिकेकडून हटवली जाऊन त्याचा खर्च वसूल करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला. नोटिशींना १५ दिवस होऊन गेले तरी कोणत्याही दुकानदाराने आपले बांधकाम स्वतःहून काढलेले नाही. कोकणनगरकडून शहराकडे येणारा मार्ग विमानतळाकडे जातो, म्हणून पालिकेने अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याबाबत नोटिसा दिल्या तरी बांधकामे हटवलेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

RELATED ARTICLES

Most Popular