26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश

रत्नागिरीमध्ये अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश

रत्नागिरी शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी मारुती मंदिर परिसरामध्ये अनैतिक व्यवसायाचे रॅकेट प्रकरण उघडकीस आले होते. भरवस्तीमध्ये सुरु असलेल्या अशा अवैध धंद्याची पाळेमुळे आता रत्नागिरी मध्येही घटत रोवली जात असल्याचे समोर येत आहे. याआधीही शहर परिसरामध्ये असे काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु असल्याचे, आणि त्यामध्ये रत्नागिरीमधील अनेक उच्चभ्रू, “सु”प्रसिद्ध अशा व्यक्तींची नावे बाहेर आली होतीत.

रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी आणखी एका अनैतिक व्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले आहे. नाचणे रोडवरील एका इमारतीमध्ये मुलीना बेकायदेशीर रित्या आणून, गिर्हाईक आणून देऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय तिथे चालवला जात असे. पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागल्याने, खोटे गिर्हाईक पाठवून त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. तिथे मुलींना बेकायदेशीररीत्या आणून व गि-हाईक आणून अनैतिक व्यवसाय सुरू आहे, याची खात्री पोलिसांना झाल्यावर, पोलिसांनी तेथे छापा टाकला असता तिथे एक पीडित मुलगी व तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणारा संशयित असे दोघेजण आढळले.

रॅकेट चालवणाऱ्या दाम्पत्यापैकी पतीला शुक्रवारी न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून फरार पत्नीचा शोध सुरू आहे. तसेच यातील पीडित मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचे नाव रावसाहेब माळी (४२ वर्षे, रा. ता. हवेली. जि. पुणे- मूळ रा. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) असल्याचे त्याने सांगितले. पूर्वी एसटीमध्ये चालक म्हणून नोकरीला असताना त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याने ती नोकरी सोडली. त्या नंतर उदरनिर्वाह करण्यासाठी आपण आणि पत्नी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गि-हाईक आणून, वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहितीही पोलिसांना दिली.

सदर प्रकरणी पोलिसांनी रावसाहेब माळी व त्याची पत्नी यांच्याविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करुन दाखल केला असून त्यातील रावसाहेब माळी यास अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.

RELATED ARTICLES

Most Popular