25.1 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriपुन्हा लॉकडाऊन होणार नाही, पण.. - जिल्हाधिकारी डॉ. पाटील

पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, पण.. – जिल्हाधिकारी डॉ. पाटील

रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदी कोणाची वर्णी लागणार याकडे जनतेचे लक्ष लागून होते. रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून त्यानंतर त्यांनी महसूल विभाग व जिल्हा आरोग्य विभागाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हयातील कोरोनाच्या अनियंत्रित परिस्थितीचा आढावा घेतला.

नूतन जिल्हधिकारी डॉ. पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी निर्बंध घातले असून, जिल्हयातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढू नये यासाठी  उपाययोजनां संदर्भात माहिती घेऊन सूचना केल्या. पदभार स्वीकारल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवार आणि उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या समवेत संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, पण कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची काळजी शासनासह प्रत्येक नागरिकाची सुद्धा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पर्यटनस्थळे जास्त प्रमाणात असून, पर्यटनाला वाव चांगल्या प्रकारे आहे. व्यापाऱ्यांसाठी त्यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्यांनी सर्व व्यापार्यांना सांगितले आहे कि, आपली दुकाने सुरु ठेवताना, प्रथम स्वत: कोरोना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. स्वत: मास्क वापरून, येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा मास्क लावूनच दुकानात प्रवेश करण्यास द्यावा. त्याचप्रमाणे सोशल डीस्टसिंग आणि हाथ स्वच्छ ठेवणे या गोष्टी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे.

कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी सर्व प्रथम रत्नागिरी जिल्ह्याला प्राधान्य देण्यात येणार असून, पॉझिटीव्हीटी दर १० पेक्षा कमी राहील याकडे लक्ष पुरविण्यात येणार आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सर्व जनता, लोक प्रतिनिधी, महसूल कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, मंत्री, पोलीस यंत्रणा यांचे आता पर्यंत केलेले कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. .

RELATED ARTICLES

Most Popular