आज २१ जून, जागतिक योग दिवस. भारतीय संस्कृती आणि योग हि असलेली महान परंपरा आज जगप्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जूनचे औचित्य साधून राज्यात २७०० पेक्षा जास्त ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, या कार्यक्रमामध्ये हजारो लोकसहभागी होतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी ऑनलाईन प्रणाली द्वारे योगशिबीर घेण्यात आली.
सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या संक्रमणावर जालीम उपाय म्हणजे योगाभ्यासाचे अवलंबन. रत्नागिरी मध्ये विविध राजकीय पक्षांच्या वतीने ठिकठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन योग शिबिरे भरवण्यात आली आहेत. योग केल्यामुळे शरीर फक्त बाहेरूनच नाही तर अंतर्गत सुद्धा तंदुरुस्त व्हायला मदत होते. पहाटेच्या वेळी केलेल्या योग साधनेमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढून कोणत्याही आजारावर मात करता येते. सध्या कोरोना काळामध्ये रुग्णांना शारीरिक ताकद टिकून राहावी म्हणून योग्य आहाराबरोबर व्यायाम आणि योगाचे धडे दिले जात आहेत.
योगसाधनेमुळे शारीरिक तसेच मानसिक संतुलन टिकून राहण्यास मदत होते. भारताला हजारो वर्षांची योगाभ्यासाची परंपरा असून, आज हि भारतीय संस्कृती अनेक देशांनी अवलंबली आहे. अनेक देशांमध्ये योगाला अधिक प्रमाणात महत्व दिले जाते. जागतिक योग दिवसानिमित्त अधिकाधिक लोकांनी या योग शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन अॅड. दिपक पटवर्धन यांनी पक्षाच्या वतीने केले आहे.
जिल्हा परिषद प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांद्वारे निदान दोन योग शिबिरांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आणि सार्वजनिक रित्या आयोजित केलेल्या शिबिराम्ध्येही पक्षाचे सर्व कार्यकर्ते सामील होणार असल्याची माहिती अॅड. पटवर्धन यांनी दिली.