23 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriरत्नागिरी बहुचर्चित “मठ प्रकरणाचा” अखेर पाच वर्षांनी निकाल

रत्नागिरी बहुचर्चित “मठ प्रकरणाचा” अखेर पाच वर्षांनी निकाल

रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथील मठामध्ये “मी देवाचा अवतार आहे” असं भक्तांना सांगून महिलांना अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी २०१६ साली व्हायरल झाला होता. त्यानंतर श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवा व त्याचा साथीदार जयंत रावराणे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्य न्यायदंडाधिकारी इटकलकर यांनी या खटल्याचा निकाल देत पाटील बुवा व त्याच्या साथीदाराला विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली असली तरी जादूटोणाविरोधी कायद्यातून मात्र अजूनही मुक्तता झालेली नाही.

महिलेशी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या हातखंबा-झरेवाडी येथील पाटील बुवाची न्यायालयाने पाच वर्षानंतर या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली.  श्रीकृष्ण अनंत पाटील असे या बुवाचे नाव आहे. ही घटना ८ सप्टेंबर २०१७ ला सकाळी  झरेवाडी येथील पाटील बुवाच्या मठामध्ये घडली होती. याप्रकरणी एका महिलेने ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

झरेवाडी येथील बहुचर्चित “मठ प्रकरणात” एका गावातील महिलेने पोलीस स्थानकात तक्रार दिली होती, यात तिने म्हटले होते,  मुलाला आकडीचा आजार असल्याने ८ सप्टेंबर २०१६ रोजी ती पीडित महिला पाटील बुवाच्या झरेवाडीतील मठात गेलेली. यावेळी पाटील बुवाने महिलेला पाहताच अश्लील भाषेत शिवीगाळ व त्याचा साथीदार रावराणे यानेही शिवीगाळ करण्यास सुरुवात करततिला धमकी दिली असे तक्रारीत म्हटले होते.

हे “मठ प्रकरण” सुरु असतानाच पाटील बुवाचे महिलांना अश्लील भाषेतील शिवीगाळ करणारे व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल होतान दिसताच पोलिसांनी पाटील बुवावर त्वरित कारवाई केली. त्यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पाटील बुवा विरोधात कलम ३५४ (अ), ५०९, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पाटील बुवांच्यावतीने ऍड. निनाद शिंदे, ऍड. राहुल चाचे, तन्वी गद्रे यांनी युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादावर मुख्य न्यायदंडाधिकारी इटकळकर यांनी पाटील बुवाला विनयभंगाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. मात्र जादूटोणा विरोधी कायद्यातून पाटील बुवाची अद्याप सुटका झालेली नाही. हा खटला न्यायालयात अद्याप कोर्टामध्ये प्रलंबित स्वरुपात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular