22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriऑनलाईन फसवणूक, रत्नागिरी पोलिसांची सतर्कता

ऑनलाईन फसवणूक, रत्नागिरी पोलिसांची सतर्कता

रत्नागिरीमध्ये अनेक वेळा पोलीस, बँकेमार्फत सतत ऑनलाईन होणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क राहण्याबाबत कायम अलर्ट करत असतात. परंतु, तरीसुद्धा अनेकजण अजूनसुद्धा अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडताना दिसून येतात.

रत्नागिरी शहरातील तांबटआळी येथे राहणाऱ्या मंदार संभाजी पाटील नामक तरुणाची ७५ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली, परंतु, शहर पोलिसांनी घेतलेल्या तातडीने केलेल्या तपासामध्ये ही रक्कम सापडल्याने ती तरुणाला परत करण्यात आली, ११ महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र तत्काळ पोलिस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी ताबडतोब चक्र फिरवली व त्या तरुणाला त्याची रक्कम परत मिळवून दिली.

मिळालेल्या माहितीनुसार मंदार ऑनलाईन पद्धतीने कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यानुसार, धनी लोन या संकेतस्थळावर मनी फायनान्स या कंपनीकडून त्याला फोन आला व आमच्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगून सुमारे ७५ हजार ४०० रूपयांची ऑनलाइन फसवणूक केली होती.

तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी संशयित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले करत होते. तपासात मंदारने ज्या खात्यात पैसे पाठवले, ते खाते बँकेमार्फत पोलिसांनी सील केले होते. ही रक्कम हरियाणातील एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये गेली होते. पोलिसांनी सुरुवातीला येथील बॅंकेशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर सायबर क्राईम शाखेच्या मदतीने हरियाणातील त्या संशयित गुन्हेगाराचे बॅंकेचे अकाउंट सील केले गेले. त्यामध्ये अंदाजे दोन लाखाच्या दरम्यान रक्कम होती. रत्नागिरी पोलिस हरियाणा पोलिसांच्या संपर्कात होते, अखेर कोर्टाच्या आदेशावरून ते अकाऊंट सील केले.

त्यामुळे संशयित गुन्हेगाराला या अकाऊंटला असलेले पैसे काढता आले नाहीत. त्यानंतर बॅंकेच्या सहकार्याने पोलिसांनी हरियाणातील त्या व्यक्तीच्या फेक खात्यात मंदारची जमा झालेली मूळ रक्कम परत मिळाली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले, पोलिस नाईक गुरव, विलास जाधव यांनी ही कामगिरी पार पाडली.

RELATED ARTICLES

Most Popular