25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriबेकायदेशीरित्या गुरांची कत्तल करणारा रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात

बेकायदेशीरित्या गुरांची कत्तल करणारा रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेच्या पूलाजवळ जानेवारी २०२२ मध्ये बोरज,  ता. खेड, जि . रत्नागिरी येथे झुडपांमध्ये काही जनावरांचे अवशेष मिळून आले होते. या ठिकाणी मिळालेल्या अवशेषांची पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करून घेतली असता मिळालेले अवशेष हे गोवंशीय जनावरांचे असल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत खेड पोलीस स्टेशन येथे भादवि क ४२९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ)(ब), ९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

बेकायदेशीरित्या गुरांची कत्तल करणाऱ्या मुंबई येथील सराईत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी पोलीसांना यश आलं. सप्टेंबर २०२० पासून रत्नागिरी पोलीस दलाचा पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी पदभार घेतल्यापासून जनावरांच्या चोरटया वाहतुकीवर विशेष लक्ष केंद्रित करुन जिल्हयातील वाहतुकीचे प्रमुख मार्गाच्या ठिकाणी असलेल्या चेकपोस्ट तसेच इतर ठिकाणी नाकाबंदी प्रभावीपणे कार्यरत केली.

पोलीस अधीक्षक, डॉ. मोहित कुमार गर्ग, यांनी या संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने खेड पोलीस ठाणे सोबत समांतर तपासाकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी चे पथक तयार करून तपासाला सुरुवात केली. या तपास पथकास तपासा दरम्यान पुर्वी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या व मुंबई येथे राहणाऱ्या एका संशयित इसमाची माहिती प्राप्त झाली.

सदर संशयिताची खात्रीलायक माहिती असल्याने, संशयिताने बोरज ता. खेड येथील गुन्हा अन्य इतर साथीदारांचे मदतीने केल्याचे कबूल केले असल्याने त्यास खेड पोलीसांनी अटक केली आहे व सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.  रत्नागिरी जिल्हयामध्ये नाकाबंदीची अंमलबजावणी प्रभाविपणे करत जनावरांच्या चोरटी वाहतुक करणारी वाहने ठिकठिकाणी पकडून आतापर्यंत जिल्हयात खालील तक्त्याप्रमाणे यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. सन २०२१ व २०२२ मधील दाखल असे सर्व गुन्हे पोलीस अधिक्षकांनी उघडकीस आणले आहेत. यामुळे जनावरांची चोरटी वाहतुक करणाऱ्या व्यक्तिना चांगलीच चपराक बसणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular