25.2 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRajapurरत्नागिरी पोलिसांची दमदार कामगिरी, २४ तासांच्या आत गुन्हेगार ताब्यात

रत्नागिरी पोलिसांची दमदार कामगिरी, २४ तासांच्या आत गुन्हेगार ताब्यात

कात्रादेवी चौकात ऑपरेशन नेत्रा अंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून चोरी करणारा आरोपी निष्पन्न झाला.

सध्या जिल्ह्यात आंबा खरेदी विक्रीचा मोसम सुरु आहे. राजापूर तालुक्यातील कात्रादेवी येथे आंबा खरेदीसाठी आणलेली १२ लाख ६५ हजार २४० रुपयांची रोकड चोरल्याची घटना घडली आहे. रत्नागिरी पोलिसांनी सीसीटिव्हीच्या माध्यमातून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरट्याने चोरलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

नौशाद महामूद शेकासन वय ५६ यांचा अनेक वर्षे आंबा खरेदीचा व्यवसाय आहे. ते राजापूर तालुक्यातील कात्रादेवी येथे तंबू उभारुन आंबा खरेदी करतात. ते ९ कामगारांसह त्याच तंबूत राहतात. त्यांनी आंबा खरेदीसाठी १२ लाख ६५ हजार २४० रुपयांची रोकड आणली होती. ती त्यांच्या जवळील काळ्या बॅगेत ठेवली होती. १० मे रोजी रात्री झोपताना त्यांनी ती रोकड आपल्या डोक्याखाली ठेवली. ते झोपले असताना अज्ञात चोरट्याने ती रोकड लंपास केली.

या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी चोरट्याला शोधण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने कात्रादेवी परिसरात चोरट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी कात्रादेवी चौकात ऑपरेशन नेत्रा अंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून चोरी करणारा आरोपी निष्पन्न झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रेहान बाबामिया मस्तान वय ३४, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी याला ताब्यात घेतले. त्याने चोरलेली रोकड पोलिसांनी हस्तगत केली.

निव्वळ २४ तासांच्या आत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, हवालदार प्रसाद शिवलकर, कुशल हातीसकर, गोपाळ चव्हाण, विकास चव्हाण, शशांक फणसेकर, नरेंद्र जाधव, विनोद रसाळ, सुभाष भांगणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, सागर साळवी, अनिकेत मोहिते यांनी केली.

RELATED ARTICLES

Most Popular