26.1 C
Ratnagiri
Thursday, July 18, 2024

जिल्ह्यात २० तारीखे पर्यंत रेड अलर्ट…

जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून...

‘सिव्हिल’मधील समस्यांचा वाचला पाढा – शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

गोरगरिबांचा आधार असलेल्या जिल्हा रुग्णालयाची वरून रंगरंगोटी...

चिपळूणमध्ये विहिरीतील पाण्यात मगरीचे पिल्लू, वनविभागाने पकडले

शहरातील वाणीआळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे...
HomeRatnagiriगेली अनेक वर्ष आरोग्याचा प्रश्न वाऱ्यावर

गेली अनेक वर्ष आरोग्याचा प्रश्न वाऱ्यावर

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आरोग्य व्यवस्थेबाबत परिस्थिती जेमतेम असल्याने वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, या दोन्ही जिल्ह्यांसाठी दोन सुसज्ज मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्येवर उपचार करण्यासाठी एकही सुसज्ज सगळ्या अत्यावश्यक सोयी सुविधा असणारे शासकीय रूग्णालय नसल्याने, इमर्जन्सी काळामध्ये स्थानिक डॉक्टर्स इथे पुरेश्या सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने रुग्णाला कोल्हापूर, मुंबई, पुणे सारख्या  मोठ्या शहरामध्ये हलवायला सांगतात, जिथे पुढील अद्ययावत उपचार घेणे शक्य होऊ शकते. पण जर प्रवासामध्ये जर तो रुग्ण दगावला तर त्याला जबाबदार कोण! मोठ्या हॉस्पिटलचा येणारा खर्च वेगळाच. रत्नागिरीमध्ये अनेक लोकप्रतिनिधी कार्यरत असून सुद्धा, रत्नागिरी मध्ये असे अद्ययावत हॉस्पिटल का होऊ शकत नाही ! असा सवाल करण्यात आला आहे.

कोरोना काळामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची झालेली भयावह परिस्थिती सर्वज्ञात आहे, तर मग लोकप्रतिनिधींची असलेली सत्ता काय उपयोगाची? गेली अनेक वर्षे प्रत्येक कोकणी माणूस अनेक संकटांचा सामना धीरोदत्तपणे करत आहे, संकटाला कंटाळून आत्महत्या केली असे क्वचितच घडले असेल, आलेल्या कठीणातील कठीण संकटात सुद्धा समर्थपणे तोंड देऊन, पुन्हा जोमाने उभा राहतो तो कोकणी माणूस.

वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक व सचिव यशवंत जडयार यांनी सहीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा तातडीचा विषय घेऊन, त्यावर त्वरित कारवाई करून दोन्ही जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती पडेल अशा ठिकाणी दोन  सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आरोग्याच्या मुद्द्यावर कोकणी माणूस किती आक्रमक होऊ शकतो, याचे देखील भान असावे, असे पत्रात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular