26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKokanजागतिक महिला दिनानिमित्त एमटीडीसी निवासस्थानात महिलांना विशेष सवलत

जागतिक महिला दिनानिमित्त एमटीडीसी निवासस्थानात महिलांना विशेष सवलत

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपतीपुळे, तारकर्ली, कुणकेश्‍वर येथिल एमटीडीसीच्या निवासस्थानामध्ये या सुविधा उपलब्ध आहेत.

८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ६ ते १० मार्च या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या म्हणजेच एमटीडीसी निवासस्थानात वास्तव्य करणार्‍या महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. ठराविक कालावधीपर्यंत सदरची योजना लागू राहणार असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपतीपुळे, तारकर्ली, कुणकेश्‍वर येथिल एमटीडीसीच्या निवासस्थानामध्ये या सुविधा उपलब्ध आहेत.

जागतिक महिला दिन प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेऊन उत्साहाने साजरा करतात. यंदाची आजची लैंगिक समानता, उद्याची शाश्वती अशी संकल्पना घेऊन यंदाचा जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रात अग्रेसरपणे, खंबीरपणे सामना करणार्‍या महिलांना अधिक सक्षम करणेकरीता तसेच त्यांच्या प्रति असलेला आदर, मान, काळजी, सन्मान, प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रयत्नशील असणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.

त्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ६ मार्च ते १० मार्च या पाच दिवसांच्या कालावधीत महामंडळाच्या पर्यटक निवासात वास्तव्यास येणार्‍या महिला अतिथीना आणि त्यांच्या परिवाराला निवासकक्ष आरक्षणावर ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. ही सुविधा फक्त निवास कक्ष आरक्षणावरच उपलब्ध आहे. महामंडळाद्वारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या पर्यटक निवासासाठी लागु असणार नाही.

या योजनेबद्दल काही अटी आणि शर्थी सुद्धा ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षण करण्यापूर्वी सर्व सूचना व्यवस्थित वाचून मगच आरक्षित करावे. या आरक्षण सवलतींना अनुसरून एखाद्या महिलेने कक्षाचे आरक्षण केल्यास ते आयत्या वेळी आरक्षण रद्द करता येणार नाही. तसेच ज्या महिलांच्या नावे आरक्षण असेल त्या महिलांनी ओळखपत्रासह उपस्थित राहणे बंधनकारक राहील. यासाठी ऑनलाईन नोंदणीची देखील सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular