21.1 C
Ratnagiri
Saturday, February 24, 2024

सुक्या काजू बियांचे दरही गडगडले,वातावरणाचा परिणाम

प्रतिकूल आणि ढगाळ हवामान, सकाळच्या सत्रामध्ये दाट...

काजरघाटी-धारेवर ब्राऊन शुगर विकणाऱ्याला अटक

शहरालगतच्या वर्दळीचे ठिकाण असलेल्या काजरघाटी- धारेवर ब्राऊन...
HomeRajapurनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यात बदल्या रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पोलीस अधिकारी बदलले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यात बदल्या रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पोलीस अधिकारी बदलले

जिल्ह्यातील ११ पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर तेथील पोलीस निरीक्षकांच्या रत्नागिरी येथे बदल्या करण्यात आल्या आहेत. तर सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. मंगळवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश काढण्यात आले. रत्नागिरीतील भरत ज्ञानदेव धुमाळ, रत्नागिरी ग्रामीणचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप, संगमेश्वरचे सुरेश गावित, देवरुख पोलिस निरीक्षक प्रदिप पोवार यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव, वैभववाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, देवगड पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची विशेष पोलिस महानिरीक्षक मुंबई यांच्या आदेशाने मंगळवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरिक्षकांसोबतच जिल्ह्यातील १० सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चिपळूणचे रत्नदीप साळोखे यांची रत्नागिरी ग्रामीणला, चिपळूणच्या रुपाली पाटील यांची रत्नागिरी शहरला, दाभोळचे तुषार पाचपुते यांची चिपळूणला, अलोरेचे सुजित गडदे यांची लांजा पोलीस ठाण्यात, रत्नागिरी ग्रामोणचे मनोज भोसले यांची देवरुखला, पुर्णगडचे विजय जाधव यांची जिल्हा वाहतुक शाखेत, लांजाचे प्रविण देशमुख यांची चिपळूण येथे, नियंत्रण कक्षातील भरत पाटील यांची अलोरे येथे, जिल्हा वाहतुक शाखेतील सुधीर धायरकर यांची पुर्णगड येथे, स्थानिक गुन्हे शाखेतील अमोल गोरे यांची दाभोळ येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील ११ पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. चिपळूणमधील वंदना कनौजा यांची खेड पोलीस ठाण्यात तर पूजा चव्हाण यांची दापोली पोलीस ठाण्यात, गुहागर येथील पवन कांबळे यांची रत्नागिरी शहरला, रत्नागिरी शहरच्या प्रशांत जाधव यांची खेड पोलीस ठाण्यात, आकाश साळुंखे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, शांताराम महाले यांची चिपळूण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. खेड येथील सुजित सोनावणे यांची गुहागरला, रत्नागिरी शहरच्या अनुराधा मेहेर यांची चिपळूण येथे, चिपळूण पोलीस ठाण्यातील शाम आरमाळकर यांची रत्नागिरी शहरला, राजापूर पोलीस ठाण्यातील शिल्पा वेंगुर्लेकर यांची चिपळूण येथे तर सावर्डे येथील धनश्री करंजकर यांची राजापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular