29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeRatnagiriराजन साळवींवर केलेल्या कारवाईचा निषेध - विनायक राऊत

राजन साळवींवर केलेल्या कारवाईचा निषेध – विनायक राऊत

आमदार राजन साळवी यांच्याविरोधात बेनामी संपत्तीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत आमदार राजन साळवी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीतून कारवाई केली आहे. आजच्या एसीबीच्या कारवाईचा मी धिक्कार करत आहे. कितीही त्रास झाले तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या आमदार राजन साळवींचा आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली. सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना जाणीवपूर्वक त्रास देऊन शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी अशी कपट कारस्थाने केली जात आहेत; परंतु अशा दडपशाहीला भीक न घालणाऱ्या आमदार राजन साळवी यांचा मला अभिमान आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.

या सोबतच मी एसीबीचे अधिकारी आणि सध्याचे सत्ताधारी यांना सांगू इच्छितो की, आमदार राजन साळवी यांच्यासारख्या लाखो निष्ठावंतांच्या सामर्थ्यातूनच उद्याची शिवसेना उभी राहणार आहे. निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या कोणत्याही दडपशाहीला बळी पडणार नाहीत, असे खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले. आमदार राजन साळवी यांच्याविरोधात बेनामी संपत्तीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन साळवी यांनी साडेतीन कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यांच्या विरोधात गुरुवारी सकाळपासून एसीबीची छापेमारी सुरू आहे. एसीबीने साळवी यांच्या घरी, त्यांच्या भावाच्या घरी आणि हॉटेलवर छापा टाकला. त्यानंतर त्यांच्या विरोधात बेनामी संपत्तीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीकडून ८ तासांपासून राजन साळवी यांच्या घरी झाडाझडती सुरू आहे. असे असले तरी राजन साळवी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाहीत, असं त्यांनी सांगितले आहे. पोलिस कोठडीत राहण्याची माझी तयारी आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular