28.7 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...

लांजा विकास आराखडा रद्द होणार नाही – आमदार किरण सामंत

लांजा विकास आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा समन्वयाची...

सीआरपी महिलांचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित लोकसंचालित साधनकेंद्रातील...
HomeRatnagiriरत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची - पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची – पालकमंत्री उदय सामंत

निवडणूक लढवली तर तीही शिवसेनेमधूनच असेल असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे वरिष्ठ नेते असून त्यांना राज्याची भौगोलिक परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे तेच या जागेबद्दल निर्णय घेतील असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नावाचाही त्यांनी यावेळी आग्रह धरला. आपले मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांना नागरिकांचा पाठिंबा आहे. त्यांनी लोकसभेत जावे असे मलाही वाटत आहे. परंतु निवडणुकीसाठी त्यांनी उभे रहावे की नाही हा त्यांचा वैयक्तीक निर्णय असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केलें.

सध्या ते रत्नागिरीत मेळावे व शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित रहात आहेत, त्यामुळे ते शिवसेनेमध्येच आहेत. त्यांनी निवडणूक लढवली तर तीही शिवसेनेमधूनच असेल असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कोणी या मतदार संघावर दावा केला तरी शिंदे-फडणवीस-पवार हेच मतदारसंघांबाबत निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. याचवेळी नांदेड दुर्घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, या घटनेचे समर्थन करता येणार नाही. या प्रकारानंतर आपण तातडीने रत्नागिरी व रायगडमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनीही सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन भेटी देण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्येक जिल्ह्यात मेडीकल कॉलेज झाले पाहिजे असे स्वप्न आहे. ते पूर्ण होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्याचा मोठा प्रश्न निकाली निघेल असेही त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या टिकेवर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांचे आरोग्याच्या क्षेत्रात मोठे काम आहे. ते घरात बसू काम करीत नाहीत किंवा कोणतेही आदेश फेसबूक लाईव्ह करीत नसल्याचा टोलाही मारला.

RELATED ARTICLES

Most Popular