वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण आदी मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू असलेला संप अद्यापही सुरू आहे. शनिवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यातील २५० एसटी आगारांपैकी ६३ आगारातील वाहतूक ठप्प होती. संपाचा सर्वाधिक प्रभाव औरंगाबाद विभागात दिसून आला. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यातील ४७ पैकी ३० आगार बंद होते.
रत्नागिरी एसटी कर्मचाऱ्यांनी देखील संपातून माघार घेतली असून, सोमवार पासून नियमित फेऱ्या १००% सुरु होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. जरी विलगीकरणाची मागणी पूर्ण झाली नसली तरी सुद्धा इतर मान्य झालेल्या मागण्यांवर अखेर कर्मचार्यांनी संपातून माघार घेतली आहे. मागील साधारण ५ महिन्यांपासून सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, एसटीची अर्थव्यवस्था पूरी कोलमडली आहे. रत्नागिरीमध्ये संप यशस्वी झाल्याने, ढोल ताश्याच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाल्याने, लवकरच सर्व फेर्या पुन्हा आधीसारख्या सुरु होण्याचे संकेत दिसत आहेत. खेड बसस्थानकात १४२ कर्मचारी सेवेत हजर झाले असून दोन दिवसात ६२ बसफेऱ्यांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत दररोज ८० बसफेऱ्या धावत असून दिवसाला सुमारे अडीच लाखाचे उत्पन्न आगाराला मिळत आहे.
राजापूर, लांजा, देवरुख बसस्थानकातून देखील काही फेर्या सुरु झाल्या असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. जसे एसटी महामंडळाचे नुकसान झाले त्याप्रमाणे कर्मचार्यांचे देखील मागील संपाचे ५ महिने नुकसान झाले आहे. त्यामुळे अजूनही काही कर्मचारी संपावर आहेत मात्र ते लवकरच हजर होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.