26.2 C
Ratnagiri
Thursday, October 24, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

या खेळाडूच्या टीम इंडियात पुनरागमनाचे भवितव्य काय…

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी आता जवळ...
HomeRatnagiriदिर्घ लढ्याला अखेर यश

दिर्घ लढ्याला अखेर यश

माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांच्या शिक्षक भारतीने केलेल्या  जुन्या पेन्शन योजने बद्दलच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. गेली अनेक वर्ष शिक्षक भारती हा शिक्षकांसाठी लढा देत आहे. राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी ज्यांची नियुक्ती  २००५ सालापूर्वी पासून झालेली आहे, त्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता त्यांचे नवीन पेन्शन योजनेमध्ये समायोजन करण्यात आले होते, यासाठी कित्येक वर्ष देण्यात येणाऱ्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.

शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांच्या कडून प्राप्त माहितीनुसार, जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती विनाअनुदानित अथवा अंशत: अनुदानित प्रशालांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी झालेली आहे. त्या शाळांना आता शासनाने शंभर टक्के अनुदान दिले आहे. या सर्व शाळांना शंभर टक्के प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता शासन ही जुनी पेन्शन योजना २००५ सालच्या आतील नियुक्ती असलेल्यांना लागू करण्याचा विचार करत आहे, आणि त्या अनुषंगाने शाळानिहाय अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची माहिती जमा करणे सुरु केले आहे. ही माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन विभागाकडून जमा करून त्यावर कार्यवाही करण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याची माहीती शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी दिली.

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन कायद्याच्या हक्कासाठी एवढ्या दीर्घकालीन चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाल्यामुळे शिक्षक भारती संघ आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular