27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriरत्नागिरीतील हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम सुरु, उष्णतेचा परिणाम

रत्नागिरीतील हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम सुरु, उष्णतेचा परिणाम

ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूसचा हंगाम जवळपास आटपत आला आहे.

कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तापमान ३२ अंश सेल्सीअसवर पोहोचले आहे. कडकडीत उन्हामुळे नागरिक त्रस्त असताना आरोग्याच्या समस्याही वाढत आहे. सध्या हापूसचा हंगाम सुरु असून, मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी विक्री सुरु आहे. परंतु, वातावरणातील सततच्या बदलामुळे त्याचा विपरीत परिणाम हापूसवर व्हायला लागला असून, त्यात साका होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला आंबा व्यवसायाचा कालावधी अंतिम टप्प्यात देखील आणखीनच अडचणीत आल्याचा दिसत आहे.

हवामान खात्याने उष्ण लहरींनी तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचा प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यात दिसत आहे. पारा ३२ अंश पार करुन हळूहळू वर सरकू लागला आहे. दिवसा कडकडीत उन्हासह उष्म्यांच्या झळांनी जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. तिच परिस्थिती रात्रीच्या वेळीही दिसून येत आहे. त्यामुळे आंबा हंगामाचा महत्वाचा महिना असलेला मे यंदा हंगामाचा शेवटचा टप्पा आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्या नंतर पुन्हा प्रचंड उष्मा वाढला. सकाळी ११ वाजल्यानंतर नागरिकांना उन्हाची झळाळी सहन करावी लागत आहे. ही उष्णतेची लाट अजून राहणार असून कोकणातील पालघर जिल्ह्यात त्याचा प्रभाव सर्वाधिक राहणार आहे. बाष्पीभवनाचा वेग वाढला असल्याने उष्ण लहरींचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातही जाणवणार आहे. दरम्यान, ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूसचा हंगाम जवळपास आटपत आला आहे. अशा प्रतिकूल वातावरणाचा फटका आंब्यासह इतर हंगामी फळपिकांना बसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular