कोकणा सारख्या दुर्गम भागात ग्राहकांना अविरत वीजसेवा पुरविण्याची जबाबदारी नेटाने पार पाडण्याचे कार्य महावितरणचे कर्मचारी करीत आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडळांने वार्षिक वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट साध्य करुन राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या कौतूकास्पद कामगिरीबद्दल मुख्य अभियंता परेश भागवत यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप दिली. रत्नागिरी स्थित कोकण परिमंडळ कार्यालयात (दि. ११) उत्तम ग्राहकसेवा व महसूल बसूलीच्या उद्दिष्टपुर्तीमुळे गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रारंभी थोर सम जसुधारक महात्मा फुले यांच्या प्रतिम स पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्गचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील, रत्नागिरीचे अधिक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा), कल्पना पाटील, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन), वैभव थोरात, कार्यकारी अभियंता कैलास लवेकर (चिपळूण), विशाल शिवतारे (खेड), बाळासाहेब मोहिते (कणकवली), अजित अस्वले (चाचणी विभाग), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अप्पासाहेब पाटील, प्रणाली विश्लेषक हर्षद आपटे, व्यवस्थापक (वित्त व लेखा), रमेश पावसकर यांची उपस्थिती होती.महावितरणच्या कोकण परिमंडळात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विभाग, उपविभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन “प्रातनिधीक गौरव करण्यात आला. मुख्य अभियंता श्री. भागवत यांचे आढावा बैठकीतील मार्गदर्शन व सातत्यपुर्ण प्रोत्साहन मिळाल्याने उद्दिष्ट साध्य करणे सोपे झाले, अशी भावना अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.