आज ९ जून रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड संक्रमित रुग्णांचा पॉझिटीव्हिटी रेट १३.९०% असून, ऑक्सिजन बेडची टक्केवारी कमी होऊन ५४.८१% वर आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये समविष्ट झाला आहे. व्यावसायिक आणि इतर संघटनांनी केलेल्या अनलॉकच्या मागणीनंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी नवीन आदेश जारी केले आहेत आणि त्यामध्ये नक्कीच छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा फायदा होणार आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी काढलेल्या नव्या आदेशामध्ये अत्यावश्यक सेवेशी सबंधित सर्व दुकाने आणि अस्थापना या नव्या आदेशामुळे सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत सुरु राहणार आहेत.
अत्यावश्यक सेवा मध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल
१. रुग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यामध्ये सहाय्यभूत निर्मिती आणि वितरण युनीटस् सह विक्रेते, वाहतुकदार व पुरवठा साखळी याचा समावेश असेल. त्याशिवाय लस, सॅनिटायझर, मास्क, वैदयकीय उपकरणे, त्यास पुरक कच्चा माल निर्मिती उदयोग व सहाय्यभुत सेवा यांचाही समावेश असेल.
२. पशुवैदयकीय सेवा / पाळीव प्राणी काळजी केंद्र व त्यांची खादय दुकाने.
३. वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज.
४. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने सकाळी ०९.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
५. शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा.
६. विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा.
७. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे.
८. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा .
९. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा
१०. SEBI प्राधिकृत बाजार व कार्यालये, Stock Exchange, व त्यासंबंधित अन्य आस्थापना
११. दुरध्वनी संबंधित सेवा
१२. मालाची / वस्तुंची वाहतुक.
१३. पाणी पुरवठा सेवा.
१४. कृषी विषयक सेवा सुरळीतपणे चालू ठेवणेसाठी आवश्यक शाखा यामध्ये शेतीच्या साधनांची
उपलब्धता, बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती यांचा समावेश राहील.
१५. सर्व वस्तूंची आयात – निर्यात
१६. ई कॉमर्स. (अत्यावश्यक माल आणि सेवा यांचा पुरवठा)
१७. मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सेवा
१८. पेट्रोल पंप व पेट्रोलियम उत्पादने (जसे की समुद्रातील व किनाऱ्यावरील उत्पादने)
१९. सर्व कार्गो सेवा
२०. डेटा सेंटर / क्लाऊड सींस /आय टी सेवा ज्या पायाभुत सुविधा आणि सेवा पुरवितात
२१. सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा
२२. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा
२३. एटीएम सेवा
२४. टपाल सेवा
२५. बंदरे आणि त्यासंबंधीच्या कृती
२६. लस / जीवनरक्षक औषधे । औषधी उत्पादने यांचे संबंधी वाहतूक करणारे कस्टम हाऊस एजंट
परवानाधारक मल्टी मोडल ऑपरेटर्स
२७. कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल / पॅकेजींग साहित्य बनविणाऱ्या आस्थापना
२८. आगामी पावसाळयासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने
२९. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा.
तसेच वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.