26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriरत्नागिरी नगरपालिका ६०% पाणी मीटर काम पूर्ण, जेवढा पाणी वापर तेवढेच पाणी...

रत्नागिरी नगरपालिका ६०% पाणी मीटर काम पूर्ण, जेवढा पाणी वापर तेवढेच पाणी बिल

आतापर्यंत ६० टक्केच्या वर मीटर बसवून झाले आहेत. मात्र, सुरु असणाऱ्या मीटर चोरीमुळे एक प्रकारे धोकाच निर्माण झाला आहे.

रत्नागिरी शहराच्या खराब झालेल्या जुन्या पाणी पुरवठा योजनेने नागरिक हैराण होते. अनेक ठिकाणी ती जीर्ण झाली होती, तुंबली होती, फुटली होती. मात्र, पालिकेकडे जुन्या पाणी योजनेचा नकाशा नसल्याने दुरूस्तीमध्ये अडथळे निर्माण होत होते. पाणी वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे पालिकेच्या नावे नागरिकानी बोंब सुरु केली होती. दर दिवशी विविध भागातील महिला पालिकेवर मोर्चा नेत होते. त्यात मुख्य जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने ३० ते ४० टक्के पाणी वायाच जात होते. या पूर्वी देखील पालिकेने नळ जोडणीला मीटर बसविले होती. परंतु कालांतराने या मीटरची चोरी होऊ लागली. अनेक भंगार व्यवसायिकांनी ती चोरल्याचा दावा तेव्हा पालिकेने केला होता.

सद्य नवीन आणि सुधारित पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता जेवढा पाणी वापर तेवढेच पाणी बिल ग्राहकांना येणार आहे. त्यामुळे वायफळ पाणी वापरावर आता एकप्रकारे अंकुश बसणार आहे. पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून १० हजार २८८ पाणी मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यापैकी आतापर्यंत ६० टक्केच्या वर मीटर बसवून झाले आहेत. मात्र, सुरु असणाऱ्या मीटर चोरीमुळे एक प्रकारे धोकाच निर्माण झाला आहे.

त्यामुळे पाणी वापरावर आता कोणताही बंधन नव्हते. मात्र, सुधारित पाणी योजना आता पूर्णत्वास जात असल्याने पाण्याचे योग्य वितरण व्हावे आणि वितरण होणाऱ्या पाण्याचे मोजदाद व्हावी, यासाठी पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून मोफत शहरातील १० हजार २८८ नळ जोडण्यांवर मीटर बसविण्याचा निर्णय घेतला. याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता सुमारे ६० टक्के जोडण्यांवर पाणी मीटर बसविले आहेत. आयएसओ प्रमाणित मीटर असून जेवढा पाण्याचा वापर तेवढे बिल आता शहरवासीयांना भरावे लागणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular