ओएलएक्सवर गाडी विकणे रत्नागिरीतील तरूणाला चांगलेच महागात पडले असून गाडी विकण्याच्या नादात ६ लाखांचा गंडा घातल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरदार राजाराम गोसावी (२८, रा. आठवडा बाजार यांनी आपली मालकीची जावा क्लासिक मोटरसायकल विक्री करण्याकरिता ओएलएक्सवर माहिती दिली होती. ही गाडी खरेदी करण्याच्या नावाखाली दिनकर नावाच्या भामट्याने आपल्याकडील सोन्याचे नाणे गोसावी यांना दिले.
हे सोन्याचे नाणे ६ लाखापेक्षा जास्त किंमतीचे आहे असे बतावणी करून सरदार गोसावी यांच्याकडून ६ लाख रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी सरदार गोसावी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी दिनकर नावाच्या इसमासह अन्य अनोखी इसम विरोधात भादैविक ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.