28.8 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriजि.प.अध्यक्षांनी लावला विकासकामांचा धडाका

जि.प.अध्यक्षांनी लावला विकासकामांचा धडाका

जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडलेल्या सभेला उपाध्यक्ष उदय बने, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड, कृषि सभापती रेश्मा झगडे,  महिला व बालकल्याण समिती सभापती भारती सरवणकर यांसह सदस्या रचना महाडीक, बाळकृष्ण जाधव, संतोष थेराडे सहभागी झाले होते. सदर सभेमध्ये दापोली मधील बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यां विरोधात भर सभेमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत, जि.प. अध्यक्ष यांनी त्यांच्याबाबत विभागीय चौकशी लावण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीमध्ये जि.प. प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे एकात्मिक पाणलोट योजनेंतर्गत संगमेश्वर तालक्यातील बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील बंधाऱ्यांची अनामत रक्कमही संबंधितांना परत करण्याच्या सुचना अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिल्या. परंतु ठेकेदारांना त्यांच्या अनामत रकमा परत केलेल्या नाहीत. हा मुद्दा थेराडे यांनी लावून धरला. या रकमा सुमारे २५ ते ३० लाखापर्यंत असल्याचे त्यांनी सभागृहामध्ये सांगितले. सदर प्रकरणी संबंधित सदस्यांशी चर्चा करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी अशा सुचना अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिल्या आहेत.

जि.परिषदेतील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याबाबतची माहिती सुद्धा सभेमध्ये देण्यात आली. समग्र शिक्षण विभागातील अभियंत्यांची पदे रिक्त असल्यामुळे ती भरेपर्यंत पूर्वीप्रमाणेच काम करण्याचा निर्णय यावेळी घेतला गेला. शाखा अभियंता खाचे यांच्याविरोधात सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या, यांच्या एकूण कारभाराबाबत आलेल्या तक्रारीवरुन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सभेत सांगण्यात आले. जलजीवन मिशनमधील कामे, विविध मार्गाने जिल्हा परिषद उत्पन्न वाढ, वाहने व निवास स्थानांच्या दुरुस्त्या, नविन प्रशासकीय इमारती बांधणे याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेत अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी ७० कोटीचा निधी उपलब्ध करून घेतला, याबद्दल सभागृहात आमदार भास्कर जाधव यांच्यासह अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular