26.6 C
Ratnagiri
Thursday, March 13, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeRatnagiriजि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक वेळ पाळत नाहीत!, पंचायत मासिक सभेत तक्रार दाखल

जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक वेळ पाळत नाहीत!, पंचायत मासिक सभेत तक्रार दाखल

जि.प. शाळांचे शिक्षक वेळेत शाळेवर जात नाहीत, या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

कोरोनानंतर शाळांचे कामकाज पूर्ववत सुरु होत आहे. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील अनेक शिक्षक वेळेवर शाळेत जात नाहीत. काहीजण तर शाळेत उपस्थितच राहत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या शिक्षकांच्या वागण्याचा शाळेतील मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होताना दिसत असल्याची तक्रार नावले यांनी मांडली. याची दखल घेतली जाईल आणि शिक्षकांना तशा सूचना करू असे गटशिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले. जि.प. शाळांचे शिक्षक वेळेत शाळेवर जात नाहीत, या विरोधात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

पंचायत समितीच्या सदस्यांची या टर्ममधील शेवटची मासिक सभा सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली मालगुंड येथे पार पडली. सर्व सदस्यांची मुदत २३ मार्चला संपुष्टात येणार असल्याने ही सभा कार्यालयाच्या सभागृहात न घेता कवी केशवसुत स्मारक सभागृहात घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकार्‍यांसह सर्व सदस्य उपस्थित होते.

त्यावेळी अनेक विषयावर चर्चा मसलत करण्यात आली. कृषी पंपाची वीज बिले भरमसाठ आल्याने शेतकर्‍यांमध्ये महावितरण विरोधात तीव्र नाराजी असून याचे पडसाद बुधवारी झालेल्या या पंचायत समितीच्या मासिक सभेत उमटले. दिलेली बिले हि एवढी जास्त आहेत कि त्याचा भरणा करणे सामान्यांना कठीण बनणार आहे.

सदस्यांनीही कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्‍त करीत शेतकर्‍यांची बिले ही कृषीच्या निकषांनुसारच आकारण्यात यावीत, असा ठराव करण्यात आला. यावेळी महावितरण अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले. अधिकचे बिल आलेल्यांचा दोन महिन्यात सर्व्हे करण्याचे आश्‍वासन महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिले. सदस्य सुनील नावले, गजानन पाटील यांनी महावितरण, शिक्षणसह विविध विभागातील समस्यांवर प्रश्न उपस्थित केले.

RELATED ARTICLES

Most Popular