आज २६ डिसेंबर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. काहीजण प्रत्यक्ष भेटून तर काहीजण होर्डिंगच्या माध्यमातून आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी दिलेल्या वेगळ्या पद्धतीने दिलेल्या शुभेच्छा हटके ठरत आहेत. रत्नागिरीतील सर्वात मोठी तब्बल ३० फुटी व्यक्तिचित्र शुभेच्छापत्र रांगोळीच्या माध्यमातून रेखाटून उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार राहुल कळंबटे यांच्याकडून उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी हि व्यक्तिचित्र रांगोळी रेखाटून घेतली आहेत. रत्नागिरीच्या इतिहासातील हि व्यक्तीचित्राची सर्वात मोठी रांगोळी ठरणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता ना. उदयजी सामंत हि रांगोळी पाहण्यासाठी नाट्यगृहात येणार आहेत. सुप्रसिद्ध रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी विविध स्पर्धामधून, विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटल्या आहेत. आणि महाराष्ट्रासह रत्नागिरीचे नाव देखील उंचावले आहे. अनेक स्पर्धामधून सहभाग नोंदवून, त्यामध्ये विविध स्तरांवर बक्षिसे मिळवली आहेत. त्यांचा विशेष हातखंडा असलेल्या संस्कार भारती रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रयोग आणि वस्तुस्थिती लोकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत.
आज सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळात ना. सामंत, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हजारोंच्या संखेने कार्यकर्ते आणि हितचिंतक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याच नाट्यगृहात तब्बल ३० फुटांचे शुभेच्छापत्र रांगोळीच्या सहाय्याने रेखाटण्यात आले आहे. ना. उदयजी सामंत, जेष्ठ उद्योजक अण्णा सामंत आणि किंगमेकर किरणशेठ सामंत यांची हुबेहून चित्र या रांगोळीत रेखाटण्यात आली आहेत.