23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriवर्धापनदिनाचे औचित्य साधून जाधव फिटनेस अॅकेडमीतर्फे महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा

वर्धापनदिनाचे औचित्य साधून जाधव फिटनेस अॅकेडमीतर्फे महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा

रत्नागिरीमध्ये प्रथमच महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली.

शरीर सौष्ठव म्हणजे पुरुषांचीच मख्तेदारी असलेली आपण सगळीकडे पाहतो. महिलांचा सहभाग त्यामध्ये अत्यल्पच असतो. पण हल्लीच्या युगात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनच काय त्यांच्या सुद्धा वरच्या हुद्द्यावर मुली आणि महिला सुद्धा आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच महिलांची शरीर सौष्ठव स्पर्धा भरवण्यात आली होती. रत्नागिरी फगरवठार गाडीतळ परिसरात गतवर्षी राष्ट्रीय खेळाडू हेमंत जाधव याने सुरू केलेल्या जाधव फिटनेस अॅकेडमीतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. १ जानेवारी रोजी जाधव फिटनेस अॅकेडमीचा पहिल्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ही रत्नागिरीमध्ये प्रथमच महिलांची शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये अनेक मुली आणि महिलानी सुद्धा उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून, कार्यक्रमाची शोभा वाढवली.

पुरुष प्रधान खेळ म्हणून ज्या खेळाला जगात सगळीकडे पाहिले जात होते,  त्या खेळाला महिला आणि मुलींनी सुध्दा सहभागी होऊन आम्ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहोत हे सिद्ध केले. आतापर्यंत या स्पर्धा मोठ्या शहरांमध्ये भरवल्या जात होत्या. आपल्या रत्नागिरीमध्ये अनेक राष्ट्रीय पुरुष शरीर सौष्ठवपटू तयार झाले असून विविध स्पर्धांमध्ये सुद्धा पारितोषिक मिळवली आहेत.

पण या खेळ प्रकारात महिला आणि मुली पुढे येत नव्हत्या. हेमंत जाधव यांनी मागील वर्षी उभारलेल्या जाधव फिटनेससेंटर मध्ये अनेक मुली आणि महिला व्यायामासाठी येतात, तेंव्हा त्यांच्याशी या विषयावर चर्चा मसलत करून त्यांनी वर्धापन दिनानिमित्त हि महिला शरीर सौष्टव स्पर्धा भरवली. या आधारे त्यांनी मुलींना नवीन दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. भविष्यात रत्नागिरीमधून उदयोन्मुख महिला शरीरसौष्ठवपटू घडतील,  असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular