महिला व बालविकास संचलित भाकर सेवा संस्थेतर्फे चालवण्यात येणार्या सखी वन स्टॉप सेंटरचा पहिला वर्धापन ‘बीएड’ शासकीय अध्यापन महाविद्यालय येथे झाला. त्यावेळी बोलताना रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले म्हणाल्या कि, सखी वन स्टॉप प्रत्येक तालुक्यात सुरु झाले पाहिजे. तसेच अडचणीच्या काळात पीडित महिलांच्या बरोबर समाजानेही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
डॉ. फुले म्हणाल्या, देशाची प्रगती फार वेगाने होत असली तरी आजही महिलांवर होणारे अत्याचार कमी झालेले नाहीत, पीडित महिलांनी न्यायासाठी समोर येणे गरजेचे आहे, अन्याय सहन करण्यापेक्षा त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक महिलेने प्रयत्न केले पाहिजे. सखी वनस्टॉप सेंटर हे पीडित महिलांच्या पुर्नवसनासाठी काम करत असून याठिकाणी येणार्या प्रत्येक पीडित महिलेचे समुपदेशन आणि कायदेशीर मार्गदर्शनही केले जाते. तसेच तिला मानसिक दडपणातून बाहेर काढण्याचे महत्वपूर्ण कामही येथे केले जाते.
रत्नागिरीत गेल्या वर्षी या सेंटरचा शुभारंभ करण्यात आला असून येथील बीएड शासकीय अध्यापन महाविद्यालय हे सेंटर कार्यान्वित आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना अश्विनी मोरे यांनी केली. भाकर संस्थेच्या संपूर्ण कामाचा आढावा देवेंद्र पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून घेतला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, सेंटरचे अशासकीय सदस्य युयुत्सु आर्ते, पत्रकार जान्हवी पाटील, महिला बालविकासचे अधिकारी अमर भोसले, अध्यापन महाविद्यालय प्राचार्या रमा भोसले, संस्थेचे देवेंद्र पाटील, अश्विनी मोरे, पवनकुमार मोरे, माहेर संस्थेचे सुनील कांबळे उपस्थित होते.
सखीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांचा सखी सन्मानाने गौरविण्यात आले. यामध्ये येथील जिजाऊ महिला बिग्रेड संघटना, अर्चना पेणकर, विमल चव्हाण,, श्रेया केळकर, प्रेरणा सुर्वे, हर्षदा शिंदे, लतिका मोरे, समृध्दी वीर, सुचिता कांबळे, सुनिता पवार, कल्पना आंबवले, जया डावर, कल्याणी शिंदे, माधुरी कळंबटे, स्वाती नाचणकर या महिलांचा समावेश होता.