26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraसुप्रिया सुळे यांनी दिली “त्या” व्हायरल व्हिडियोवर प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी दिली “त्या” व्हायरल व्हिडियोवर प्रतिक्रिया

शिवसेनेचे राज्यसभेचे खास. संजय राऊत यांची कन्या पूर्वश्री हिचा २९ नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा पार पडला. मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत गाण्याच्या तालावर ठेका धरला.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र मल्हार यांच्या सोबत पूर्वश्रीचे लग्न झाले आहे. लग्नाआधी संपन्न झालेल्या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमाला राज्यातील बडे नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी केलेल्या डान्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि तोच सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यानंतर, अनेकांनी सोशल मीडियातून त्यांच्या नृत्याच कौतुक केलं आहे,  तर काहींना टोकाची टीकाही केली आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करत,  दोन्ही नेत्यांना लक्ष्य केलं आहे.

ते म्हणाले कि, राज्यात “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत,  शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुमच काय सुरु आहे तर तुम्ही लग्नामध्ये नृत्य करत आहात? अशा शब्दात विखे पाटलांनी सुळे-राऊत यांच्या डान्स व्हिडिओवर खरमरीत टीका केली. अनेकांनी त्यावर केलेल्या टीका टिप्पणीला आता खासदार सुळे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीमध्ये संसंदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी हजर आहेत. तत्पूर्वी एक दिवस अगोदर मुंबईमध्ये खास. संजय राऊत यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला त्यांची उपस्थिती होती. मात्र, या सोहळ्यातील डान्समुळे त्यांची उपस्थिती जास्तच लक्षवेधी ठरली. त्यावर त्या म्हणाल्या कि, “तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता,  आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. त्यामध्ये,  बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो,  त्यावरही कुणाला टीका करायची असेल तर काय बोलणार?,’ असा प्रतिप्रश्न करत सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्या समेवतच्या डान्सवरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular