25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeEntertainmentरवी तेजाच्या 'टायगर नागेश्वर राव'चा ट्रेलर रिलीज

रवी तेजाच्या ‘टायगर नागेश्वर राव’चा ट्रेलर रिलीज

येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच २० ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी तेजा यांचा मोस्ट अवेटेड ‘टायगर नागेश्वर राव’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता या चित्रपटासाठी चांगलीच वाढली आहे. काही काळापूर्वी, ‘टायगर नागेश्वर राव’ चे पोस्टर निर्मात्यांनी रिलीज केले होते, ते पाहिल्यानंतर चाहत्यांना रवी तेजा यांच्या पहिल्या पॅन इंडिया चित्रपट टायगर नागेश्वरा रावची उत्सुकता वाढली होती. दरम्यान, आता रवी तेजाच्या ‘टायगर नागेश्वर राव’चा शानदार ट्रेलर निर्मात्यांनी रिलीज केला आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

ट्रेलरमध्ये रवी तेजाची दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळते – ‘टायगर नागेश्वर राव’चा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपटही शाहरुख खानच्या ‘जवान’प्रमाणे अॅक्शनने परिपूर्ण आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये नागेश्वर राव यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले आहेत. वामसी कृष्णा नायडू-वामसी कृष्णा अकेला दिग्दर्शित ‘टायगर नागेश्वरा राव’च्या या ट्रेलरने चाहत्यांची मने जिंकली असून रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर या ट्रेलरचे खूप कौतुक होत आहे.

या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे – येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच २० ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, मल्याळम, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये या चित्रपटाचा रसिकांना आनंद घेता येईल. रवी तेजा व्यतिरिक्त या चित्रपटात नुपूर सेनन आणि गायत्री भारद्वाज देखील आहेत. याशिवाय रेणू देसाई, अनुपम खेर, नसीर, जिशू सेनगुप्ता, हरीश पेराडी आणि मुरली शर्मा हे देखील चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular