टोकियो ऑलिम्पिक कुस्तीमध्ये भारतासाठी बुधवारचा दिवस खुप चांगला होता, कारण फ्रिस्टाईल पैहलवान रविकुमार दहिया ने पुरूष 57 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. पण सोशल मिडियावर सामन्याचे असे काही फोटो आणि विडियो आले आहेत कि, त्यामध्ये दिसत आहे कि विरोधी खेळाडूने रविला चावल्यानंतरही रविने पकड सोडली नाही. अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर रवि कुमार दहियाने टोकियो ऑलिम्पिक मध्ये कुस्तीमध्ये भारतासाठी एक पदक पक्कं केलं आहे. आता सर्वांचे लक्ष सुवर्ण पदकावर आहे.
परंतु उपांत्य सामन्यात विरूद्ध खेळाडूकडून खेळ भावना दिसली नाही. 23 वर्षिय दहिया कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेव विरूद्ध 7-9 ने पाठी होता, तेव्हा विक्ट्री बाय फाॅल नुसार आपला विजय निश्चित केला. सामन्या दरम्यान कझाकिस्तानच्या पैहलवान रवि कुमार दहियाला आपल्या वरून बाजूला करण्यासाठी रविच्या हाताला चावत राहिला, पण भारतीय खेळाडू दटून राहिला.
पुर्व भारतीय क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग ने या घटनेवर निराशा व्यक्त करत बोलले कि हे चुकीचे आहे, पण ह्यामुळे आपल्या रवि दहिया वर जोश कमी करू शकला नाही. रवि दहियाच्या विजयानंतर पुर्ण देशामध्ये जल्लोष सुरु केला आहे, सामन्या दरम्यान विरूद्ध पैहलवानाने रवि कुमारच्या हाताला चावल्याचे समोर आले. फोटोमध्ये त्याचा उजव्या हातावर चावल्याचे दिसत आहे. दर्शक या गोष्टीवर नाराज आहेत.
दहियाने सामन्या दरम्यान जोरदार प्रदर्शन करत विरोधी खेळाडूच्या पायावर हल्ला केला व त्याला पाडून विजय मिळवला. दहिया ने या आधीचे दोन सामने तांत्रिक कार्यक्षमतेने जिंकले होते. रविकुमार दहिया 5 ऑगस्ट ला सुवर्ण पदक साठी उतरेल. याआधी 2012 मध्ये सुशील कुमार ने लंडन ऑलिम्पिक मध्ये अंतिम सामन्यात प्रवेश करून रौप्य पदक मिळवले होते. रवि दहिया अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला चौथे पदक निश्चित झाले आहे. याआधी मिराबाई चानू ने रौप्य पदक, पी व्ही सिंधूने कांस्य पदक जिंकलं आहे. बुधवारी लवलिना बोरगोहेन ने कांस्य पदक आपल्या नावे केले.
कांस्य पदकासाठी खेळणार दिपक पुनिया
दिपक पुनिया उपांत्य सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर आता कांस्य पदकासाठी खेळेल. पुनिया 86 किलो वजनी गटात उपांत्य सामन्यात अमेरिकेचा 2018 विश्र्व चॅम्पियन डेविड माॅरिस टेलर याचाकडून एकतर्फी हरला. टेलरच्या तांत्रिक कार्यक्षमतेपुढे पुनिया कडे कोणतेच उत्तर नव्हते.