26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम देशात दुसर्‍या क्रमांकावर अव्वल

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम देशात दुसर्‍या क्रमांकावर अव्वल

नाबार्डचे सोळा जणांचे पथक बी. श्रीधरन यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आले आहेत.

नाबार्डचे सोळा जणांचे पथक बी. श्रीधरन यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. यामध्ये विशेष करून कोरोनानंतर कृषी, सहकार क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, तळागाळातील बँकांसह सहकारी विकास सोसायटींना भेट देणे हाच निव्वळ उद्देश होता. देशामध्ये उत्कृष्ट काम म्हणून ओळखल्या जाणार्‍या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला या पथकाने शनिवारी भेट दिली. त्यानंतर पथकाकडून बँकेसह जिल्ह्यातील स्थितीची माहिती घेतली.

त्यावेळी बोलताना बी. श्रीधरन यांनी बँकेच्या उत्कृष्ट कार्यप्रणालीबद्दल गौरवोद्गार काढले. पुढे बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यातीलच नव्हे तर देशातील अव्वल दुसर्‍या क्रमांकाची आहे. बँकेचे कामकाज उत्तम असून शाळेतील ‘अच्छे बच्चे’  असेच त्यांचे वर्णन करावे लागेल, असे सांगत नाबार्डचे महाप्रबंधक बी. श्रीधरन यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

रत्नागिरी शाखेसोबतच त्यांच्या पथकाने आरडीसीसीच्या लांजा आणि साखरीनाटे येथील विकास सहकारी सोसायटींनाही त्यांनी भेटी दिल्या.  ते म्हणाले,  कोरोनामधुन सावरण्यासाठी शेतकर्‍यांना काय हवे आहे, याची लहानांत लहान माहिती गावागावात जाऊन घेण्याचे काम चालू आहे. इच्छुक असलेल्यांना कर्ज मिळते का,  प्रस्ताव रद्द का होत आहेत याची कारणेही जाणून घेत आहोत.

कोकणात कृषी-पर्यटनाला वाव आहे. तसेच शेती मध्ये केले जाणारे अनेक प्रयोग येथील तरुणांच्या मदतीने यशस्वी होताना दिसत आहेत. तरुणाई सुद्धा शेती व्यवसायाकडे वळू लागली असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मेहनतीची जोड असेल तर यामध्ये अपयश नाही. येथील हापूसवर आधारीत प्रकल्प उभारण्यावर भर दिला तर निश्‍चितच त्यामधून रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी एखादा कृषी प्रक्रिया उद्योग सुरु केला, तर त्याच्याशी निगडीत व्यावसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी नाबार्डकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे.

कोरोना कालावधीत जे बेरोजगार झाले आहेत, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमधून गावाकडे परतलेल्यांना तेथेच रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी गावांचा सर्व्हे केला जाणार असून तेथील उत्पादने कोणती, कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करता येणार का याची माहिती घेतली जाईल. भविष्यात निर्यातीवर भर दिला जाणार असून त्यासाठी दर्जेदार मालाचे उत्पादन कसे मिळवता येईल याकडे लक्ष दिले जाईल. त्यादृष्टीने नवीन धोरणे तयार करण्याचा विचार सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular