22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यात महायुतीत बंडखोरी? भाजपसह आरपीआयही रिंगणात

जिल्ह्यात महायुतीत बंडखोरी? भाजपसह आरपीआयही रिंगणात

कोकणातील सुपुत्र संदेश मोहिते हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये बंडाचे झेंडे फडकले आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघाची जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजपचा तसेच महायुतीतील आणखी एक घटक पक्ष असलेला भारतीय रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी एकही मतदारसंघ भाजपला न मिळाल्याने भाजपा कार्यकत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. रत्नागिरी आणि गुहागर हे पारंपारिक मतदारसंघ आपणाला मिळावेत अशी भाजपची मागणी होती. मात्र ती मान्य झाली नाही. त्यामुळे नाराज झालेले भाजप उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुहागर विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार आहे.

निलेश सुर्वे रिंगणात – अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी गुहागरमधून भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असुल्याचे वृत्त हाती आले आहे. भाजपच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुर्वे अर्ज दाखल करणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे चिपळूण आणि खेड दोन तालुका अध्यक्ष यावेळी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती निलेश सुर्वे यांनी दिली.

एबी फॉर्म मिळणार? – २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत निलेश सुर्वे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या दुपारपर्यंत सुर्वे यांना भाजपकडून एबी फॉर्म मिळण्याची शक्यता असल्याचेही चर्चीले जाते. मात्र भारतीय जनता पार्टीकडून एबी फॉर्म मिळाला नाही तरी सुर्वे अपक्ष लढणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

आरपीआयही रिंगणात ? – गुहागर विधानसभा मतदार संघातून आरपीआय आठवले गटाचे केंद्रीय संघटक संदेश मोहिते मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे केंद्रीय संघटक आणि कोकणातील नेते स्व. अॅड. दयानंद मोहिते यांचे सुपुत्र संदेश मोहिते हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गुहागर विधानसभेसाठी मंगळवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा.. ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मोहिते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. संदेश मोहिते यांची उमेदवारी ही महायुतीतील बंडखोरी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरपीआय (आठवले) पक्षाचे केंद्रीय संघटक संदेश मोहिते यांनी सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीतील मित्र पक्षांच्या -भूमिकेवर नाराजी व्यक्त केली, प्रत्येक निवडणुकीत आरपीआय आठवले पक्षाचे महायुतीला सहकार्यलाभते. लोकसभेतही प्रामाणिकपणे पक्षाने काम केले. पक्षाचे अध्यक्ष, ना. रामदास आठवले यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मागणी होती. मात्र त्यांना केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद दिले गेले. विधानसभा निवडणुकीत महायुतीत घटक पक्ष असतानाही आरपीआय पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. हा पक्षावर झालेला अन्याय आहे.

पक्षाचा आमदार, खासदार असेल तर विकासात्मक कामे करताना अडचणी येत नाहीत. यामुळेच आपण गुहागर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचेही मोहिते यांनी यावेळी सांगितले. गुहागर विधानसभा मतदार संघातून वडील स्व. अॅड. दयानंद मोहिते यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी डॉ. विनय नातू यांच्यासमोर त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र त्यानंतर आम्ही सातत्याने या भागात काम करत आहोत. जनतेचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करत असतो. तरूणांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, चिपळूण- गोवा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी व्हावा, येथील रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न, शेतकरी, आंबा-कांजू, नारळ, सुपारी बागायतदारांच्या अडचणी, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रासह विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. यामुळे जनतेने मला सेवा करण्याची एकदा संधी द्यावी, असे आवाहनही संदेश मोहिते यांनी केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सदस्य संदीप मोहिते, तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, सरचिटणीस उमेश सकपाळ, जिल्हां सरचिटणीस विद्याधर गमरे, शहर अध्यक्ष मंगेश जाधव, सरचिटणीस अमोल कदम, सहसचिव भूपेंद्र पवार, उपाध्यक्ष श्रीपत पवार, सल्लागार सुधीर गमरे, अशोक पवार, सदस्य प्रकाश गमरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular